दिनांक 20 मे 1766 : इंदूर राज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचा झेंडा अटकेपार नेणारे महान योद्धे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे पहिले सुभेदार, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांच्या स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
दिनांक 20 मे 1938 : महाड येथील प्रसिद्ध गाडीतळात झालेल्या जाहीर सभेत, मुंबई प्रांतातील कॉंग्रेसचे राजकारण व खोती बिले या दोन विषयावर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शेठ सावकारांच्या पैशावर निवडून आलेले काँग्रेस सरकार आपल्या अन्नदात्याच्या विरुद्ध कायदे करून शेतकऱ्यांचे हित केव्हाच करू शकणार नाही. खोती नष्ट करण्याचे मी हाती कंकण बांधले आहे”
दिनांक 20 मे 1956 : व्हाईस ऑफ अमेरिका’ या संस्थेने योजलेल्या संवाद मालिकेत “भारतीय लोकशाहीचे भवितव्य” या विषयावर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले.
दिनांक 20 मे 1951 : शेड्युल्ड कास्टस वेलफेअर असोसिएशन आणि भारतीय महाबोधी सोसायटी यांच्या विद्यमाने नवी दिल्ली येथे आंबेडकर भवनात बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मावर टीका करून बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ, मानवता व समतावादी आहे हे विशद केले.
दिनांक 20 मे 1950 : सिकंदराबाद येथे हैद्राबाद राज्य शेडयुल्ड कास्टस फेडरेशनच्या सभेत कायदेमंत्री विश्वरत्न डॉ भीमराव आंबेडकरांचे भाषण.
दिनांक 20 मे 1945 : मुंबई येथील केप मॉडेल या उपाहार गृहात नामदार मजूर मंत्र्याच्या सन्मानार्थ विश्वरत्न डॉ भीमराव आंबेडकरांना त्यांच्या मित्रांनी भोजन दिले.
दिनांक 20 मे 1911 : “आर्थिक दुर्बल घटकांना फी माफी” असा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ठराव पास केला.
दिनांक 20 मे 1915 : सारस्वत ब्राम्हणांसाठी श्रीमती सरस्वती गौड सारस्वत ब्राम्हण वसतिगृहाचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते उद्घाटन.