Categories

Most Viewed

10 सप्टेंबर दिनविशेष

1902 : वतन व जप्ती सबंधी फेरविचार करण्यासाठी राजपुरोहित नारायण राजोपाध्य यांनी पाठविलेल्या विनंती पत्रास राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी नकार दिला.

1932 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महार बालवीर संस्थेमार्फत परळ मुंबई येथील दामोदर हॉल मध्ये झालेल्या सभेत भाषण.
सदर भाषण दिनांक 17 सप्टेंबर 1932 रोजी जनता मध्ये प्रकाशित झाले.

1944 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्प येथे गैनिनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या संत महंत व गोसाव्यांच्या परिषदेला हजर राहिले. या परिषदेत संतासाठी एक मध्यवर्ती संस्था स्थापण्याचे ठरविण्यात आले.

2015 : कोयासन विद्यापीठ, जपान यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password