1930 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राव बहादुर आर श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून गोलमेज परिषदेत हजर राहण्याचे आमंत्रण गव्हर्नर जनरल यांनी दिले.
1943 : मजूरमंत्री विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय मजूर परिषदेचे दुसरे अधिवेशन संपन्न झाले. आपल्या भाषणात त्यांनी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सांस्कृतिक साधने आणि आरोग्याची साधने याविषयी कामगारांच्या मागण्या मांडल्या.
1954 : ‘ वर्गीकृत जाती आणि अन्य वर्गीकृत जाती ‘ आयुक्त यांच्या प्रतिवृत्तावर भाषण करताना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या बाबतीतल्या सरकारी धोरणावर आणि हिंदूच्या वृत्तीवर खरमरीत टीका केली.
1954 : अस्पृश्यता विषयक गुन्हे या विधेयकावर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेत म्हणाले की, “अस्पृश्य बाबत गुन्हा करणाऱ्यांना शासन केल्याविना अस्पृश्यतेचे निर्मूलन होणार नाही. सामाजिक बहिष्कार टाकणा-यांना शिक्षा दिली पाहिजे. कारण ते आपल्या सांपत्तिक स्थितीमुळे खेड्यातून अस्पृश्यांवर बहिष्कार टाकून त्यांना घटनेने दिलेले अधिकार उपभोगण्यास प्रतिबंध करू शकतात.”
2001 : महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये, डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, 17 वा खंड आयुष्यमान वसंत मून यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला.