07 सप्टेंबर 1931 ते 01 डिसेंबर 1931 : लंडन येथे दुसऱ्या गोलमेज परिषदेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांसह काँग्रेसतर्फे गांधीजी ही सहभागी झाले होते. या परिषदेत अस्पृश्यांना इतर अल्पसंख्याकांसह स्वतंत्र मत्सर संघ देण्याच्या मुद्यावरून गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकरांत तीव्र मतभेद निर्माण झाले.
1936 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे डी सी मिशन पुणे येथे आगामी असेंब्लीच्या निवडणुकीसाठी विचार विनियम करण्यासाठी पुण्यातील पुढारी व इतर मंडळी समोर आगामी निवडणुकीचे भाषण.
1949 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची दिल्ली येथे भेट.
1951 : काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठका झाल्या.