1895 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सौ रखमाबाई केळवकर यांची लेडी सुपरिटेंडेट ऑफ दि वुमेन्स स्कूल म्हणून कोल्हापूर संस्थानातील मुलींच्या शाळेवर देखरेख करण्यासाठी नेमणूक केली.
1902 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा हातकणगले नगरपालिकेकडून मागासवर्गीयांसाठी 50% राखीव जागा ठेवण्याच्या जाहीरनामासाठी सत्कार करण्यात आला.
1911 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मुलीचा मुलगा दत्तक घेण्यास हिंदूंना परवानगी देणारा हुकुम काढला.
1943 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ”गांधी आणि अस्पृश्य जनांचे बंधविमोचन” या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली.
1947 : मुंबई नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाने पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ राजेंद्र प्रसाद व मौलाना आझाद यांना मानपत्र देण्यासाठी एक ठराव केला. विरोधी पक्षातील सभासदांनी भारतातील नवीन मंत्रिमंडळातील आंबेडकर, गाडगे आणि पापा यांच्यासह सर्व मंत्र्यांना मानपत्र द्यावे अशी सूचना केली. त्यांच्या सूचनेला स का पाटील यांनी विरोध केला.
1951 : औरंगाबाद येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमाने सुरू केलेल्या कॉलेजच्या नव्या इमारतीची कोनशिला स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र प्रसाद यांना वेरूळची लेणी पहावयास घेऊन गेले.