1901 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मुंबई येथील ताडदेव या ठिकाणी असणाऱ्या जैन विद्यार्थी वस्तीगृहास भेट दिली.
1902 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दत्तक आई आनंदीबाई राणीसाहेब यांच्या स्मरणार्थ करवीर निवासीनी अंबाबाई च्या मंदिराला 1200/- रुपये किंमतीची घंटा अर्पण केली.
1928 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा समता संघ, सी के बोले आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या धैर्याने अस्पृश्य गणलेल्या हिंदूनी मंडपामध्ये गणपतीच्या मूर्तीची पूजा करण्याचा अधिकार संपादन केला.
1936 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शंकरदास नारायण बर्वे यांच्याबरोबर मुलगा यशवंत आणि पुतण्या मुकुंद यांना पंजाबच्या अमृतसर येथील गुरुद्वारांमध्ये शीख धर्म समजून घेण्यासाठी पाठवले.
1937 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दलित वर्गाने मसूर येथे भरलेल्या जिल्हा परिषदेत अध्यक्ष अध्यक्ष अध्यक्षीय भाषण.
1938 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सावकारी नियंत्रण विधेयक तयार केले.
1949 : घटना समितीला सुट्टी पडली तेव्हा काश्मीरचे मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या निमंत्रणावरून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रीनगर येथे विश्रांतीसाठी गेले.
टिप : वर नमूद केलेल्या सर्व दिनविशेष सप्टेंबर महिन्यातील असून त्या दिनविशेष चे वर्ष नमूद आहे, परंतू तारीख मिळालेली नाही. तारीख मिळाल्यानंतर दिनविशेष मध्ये करेक्शन करण्यात येईल याची नोंद असावी.