दिनांक 11 डिसेंबर 1927
बारा पाखाडी, पाली, दांडा रोड, वांद्रे, मुंबई येथील मंडळीच्या विद्यमाने विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली महाड सत्याग्रहाच्या मदतीकरिता झालेल्या जाहीर सभेत महाड सत्याग्रहात भाग घेण्यासाठी आव्हान केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, “महाडच्या चवदार तळ्यावर जो सत्याग्रह करावयाचा तो स्पृश्य हिंदू आपणास अपवित्र मानतात म्हणून. नव्हे तर स्पृश्य हिंदू व आपण हे बरोबरीचे आहे.”
दिनांक 11 डिसेंबर 1930
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी रणखांबे यांना लंडनहून पाठवलेल्या पत्रात इंग्रजीचे महत्व नमूद केले.
दिनांक 11 डिसेंबर 1938
श्रीरामपूर, जिल्हा नगर येथे महार परिषदेत विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी अध्यक्षीय भाषण केले.
दिनांक 11 डिसेंबर 1946
घटना परिषदेच्या कायम अध्यक्षपदी डाँ राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली.
दिनांक 11 डिसेंबर 1955
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांचे रिपब्लिकन पक्ष घटना मसुद्यासबंधी नाशिक येथे कार्यकारी समिती समोर मार्गदर्शन.