Categories

Most Viewed

06 मार्च 1932 भाषण

“कोणाच्याही शिकवणुकीने आपसात बेकी होऊ देऊ नये”

भारतीय राऊंड टेबल परिषदेच्या मतदान कमिटीची स्पेशल गाडी रविवार तारीख 6 मार्च 1932 रोजी सोलापूरास पाच वाजता आली. याच गाडीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर येणार असल्यामुळे शहरवासी सर्व बहिष्कृत लोक मिरवणुकीच्या धर्तीने दोन वाजल्यापासूनच स्टेशनवर जमले होते. लोकांच्या गर्दीमुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी अस्पृश्यांपैकी 50 निवडक माणसे व काही स्पृश्य मंडळीना प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी दिली होती. त्याप्रमाणे मे पापासाहेब, बेंच मॅजिस्ट्रेट, धर्माजी खरटमल म्यु. कौन्सिलर, मोहनदास बाबरे म्यु, कौन्सिलर, रा. जिनाप्पा मेदाळे, तोरणे मास्तर, रा. ब. डॉ. मुळे, डॉ. वैशम्पायन एम. एल. सी. व श्री. प्रधान वकील एम. ए. एलएल. बी. वगैरे स्पृश्य व अस्पृश्य मंडळीनी डॉ. आंबेडकरांना प्लॅटफार्मवर भेट दिली. हारतुरे घालण्यात आल्यावर स्टेशनबाहेर जमलेल्या असंख्य जनसमूहाच्या आग्रहास्तव ते बाहेर आले. त्यांच्या जयजयकाराने तेथील वातावरण काही वेळ दुमदुमून गेले होते.

में पापासाहेब बेलपवार यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विलायतेमधील व हिंदुस्थानातील कामगिरीचा गौरवाने उल्लेख केला. डॉ. आंबेडकरांच्या प्रयत्नाशिवाय खरा अस्पृश्योद्धार होणारच नाही असे सांगितले. रा.ब. डॉ. मुळे यांचेही गौरवपर भाषण झाले. त्यानंतर डॉ. आंबेडकर उत्तरादाखल म्हणाले,

सोलापूरच्या महार, मांग, ढोर, चांभार, भंगी वगैरे मंडळींनी आपापसात एकी केली पाहिजे आणि कोणाच्याही शिकवणीने आपसात चेकी होऊ देऊ नये. आपल्यातल्या बेकीचा फायदा वरिष्ठ म्हणविणारे लोक घेतात हे विसरू नका. वेळेच्या अभावी डॉ. आंबेडकरांना जमलेल्या मंडळीचा थोडक्यात निरोप घेणे भाग पडले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password