बुद्धाच्या व जैनांच्या अहिंसेत महदंतर आहे.
नवी दिल्ली येथील बुद्ध विहारात महाबोधी सोसायटीने दिनांक 5 फेब्रुवारी 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आयोजित केले होते. ते म्हणाले,
कम्युनिझमला उत्तर देऊ शकत नाही असा कोणताही धर्म अस्तित्त्वात राहाणार नाही. माझ्या मते, कम्युनिझमचा प्रतिकार करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा केवळ बुद्धधर्मच आहे.
जे लोक सर्व धर्मावर विश्वास ठेवतात आणि प्रत्येक धर्मातून थोडेफार निवडून उचलतात त्यांच्याशी माझे सहमत नाही. अशा प्रकारची प्रवृत्ती भारतात निदर्शनास येते. प्रत्येकाने आपापली निवड करावी आणि तिच्यावर विसंबून राहावे.
प्रत्येक धर्म दुसऱ्याहून भिन्न असण्याचीच शक्यता आहे. बुद्ध धर्माने उपदेशिलेली अहिंसा आणि जैन धर्माने उपदेशिलेली अहिंसा यात महदंतर आहे. जैन धर्माने अहिंसेला अतिरेकास नेऊन पोहोचविले.