Categories

Most Viewed

02 फेब्रुवारी 1929

याच जन्मी सर्वांगीण उन्नती करायला हवी.

वालपाखाडी येथे तारीख 2 फेब्रुवारी 1929 रोजी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली मराठी, गुजराती अस्पृश्यांची जंगी सभा भरली होती. बहिष्कृत भारत व समता या पत्राचा प्रसार करून अस्पृश्य समाजात जागृती करणे. तारीख 9-10 मार्च रोजी भरणाऱ्या मुंबई इलाखा महार वतनदार परिषदेस मदत देणे वगैरे ठराव सभेत पास करण्यात आले. अस्पृश्योद्धारक डॉ. आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले,

अस्पृश्य समाजाने आहे त्या स्थितीतच राहण्याची वृत्ती सोडली पाहिजे. इतर समाज जशी विद्या, अधिकार, संपत्ती मिळविण्याकरिता खटपट व प्रयत्न करितात त्याचप्रमाणे अस्पृश्य समाजानेही केले पाहिजेत. पुढल्या जन्मी आपले कल्याण होईल अशा पोकळ वार्तावर विश्वास न ठेविता याच जन्मी व याच काळी आपली सर्वांगीण उन्नती करून घेऊन मानवी समाजात समानतेचा दर्जा प्रस्थापित करून घ्यावा व हिंदू समाजाला अस्पृश्यतेच्या पापातून मुक्त करावे. सभेत प्रधान बंधू, कद्रेकर, गणपत बुवा जाधव, खोलवडीकर, गंगावणे वगैरे मंडळी हजर होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password