आपल्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांचा प्रतिकार दलित प्राणपणाने करतील.
नवी दिल्ली येथे दिनांक 29 जानेवारी 1953 गुरु रविदास 555 व्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला जनसमुदाय हजर होता.
त्या प्रसंगी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
गुरु रविदास तेराव्या शतकात होऊन गेले. त्यांनी दलित उद्धारासाठी खूप परिश्रम केले. दलित जनतेवर होणारा अत्याचार, जर इतः थांबला नाही तर दलित जनता प्रसंगी देशाच्या हिताहिताचा न करता आपल्यावरील अन्याय प्रतिकारासाठी पुढचं पाऊल टाकील. दलित जनतेच्या हक्कांवर दिवसेंदिवस अतिक्रमण होत असून त्यांच्यावरील अन्याय वाढत चालला आहे. ही स्थिती वेळीच थांबली नाही तर स्वोद्धाराचा मार्ग आम्हाला चोखाळावा लागेल. आमच्या हितरक्षणासाठी आम्ही धीट व समर्थ नाही असा तुमचा समज होत असेल तर तो चुकीचा आहे.