Categories

Most Viewed

18 जानेवारी 1956 भाषण

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कृत्य निषेधार्ह.

दिल्ली येथे दिनांक 18 जानेवारी 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले.

फक्त पंधरा टक्के गुजराती लोकांसाठी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कृत्य निषेधार्ह आहे. इतर अनेक राज्यात 15 टक्क्याहून अधिक अल्पसंख्य लोक असता कोणीही त्यांच्यासाठी वेगळी राज्ये केली नाहीत. मुंबईचा कारभार केंद्रशासित करण्यात कोणत्या दृष्टीने मुंबईचे लोक इतरांहून कमी प्रतीचे आहेत ?

मुंबई शहराचे जादा उत्पन्न विजेमुळे होते. ही वीज महाराष्ट्राकडून खरीदलेली असते व ती मुंबईत वापरली जाते. या विजेच्या उत्पन्नाचा भाग महाराष्ट्राला मिळाला पाहिजे.

महाराष्ट्राचे चार भाग करण्यात यावेत अशी माझी सूचना आहे. मुंबईचे वेगळे राज्य करण्यास महाराष्ट्रीयांनी हरकत करण्याचे कारण नव्हते. काही लोक एकत्र करून त्यांच्यावर गरीब व मागासलेल्या लोकांबद्दल आस्था न वाटणारे सरकार स्थापन करण्यात अर्थ नाही. मी सुचविल्याप्रमाणे चार राज्ये स्थापन करण्यात यावीत आणि मुंबईचे जादा उत्पन्न या राज्यात वाटण्यात यावे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password