Categories

Most Viewed

14 जानेवारी 1946 भाषण

जे लोक कोट्यावधींना अस्पृश्य नि गुन्हेगार मानतात, त्यांना स्वातंत्र्य मागण्याचा हक्क कसा पोहोचतो ?

अस्पृश्यांचे एकमेव पुढारी व हिंदुस्थान सरकारच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तारीख 14 जानेवारी 1946 रोजी सोलापूर येथे सकाळच्या मद्रास मेलने आले.

सकाळी सोलापूर नगरपालिका व जिल्हा लोकल बोर्ड या संस्थेच्या वतीने हरिभाई देवकरण हायस्कूलचे कै. रा. ब. मुळे स्मारक मंदिरात डॉ. साहेबांना मानपत्र अर्पण करण्यात आले. याप्रसंगी शहरातील प्रमुख व्यापारी, डॉक्टर्स, सरकारी अधिकारी वकील इत्यादि निमंत्रित मंडळी उपस्थित होती.

सुरवातीस नगरपालिकेतर्फे देण्यात येणारे मानपत्र नगराध्यक्ष रा. ब. नागप्पा अण्णा अफजूलपूरकर यांनी वाचून दाखवून ते डॉ. बाबासाहेबांना अर्पण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा बोर्डाचे मानपत्र बोर्डाध्यक्ष श्री. जी. डी. साठे यांनी वाचून अर्पण केले. मानपत्रांना उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले.

मला मानपत्रे अर्पण केल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. सोलापूर शहरास मी अपरिचित नाही. येथे मी बऱ्याच वेळा आलेलो आहे. राजकारण व समाजकारण यांचा प्रचारही केलेला आहे. खरे पाहिले तर सार्वजनिक कार्याची मुहूर्तमेढ सोलापुरातच मी रोवली. कै. डॉ. रा. ब. मुळे यांनी अस्पृश्यांसाठी बोर्डिंग उघडले. त्यांचेच कार्य त्यांचे बंधु डॉ. भालचंद्रराव उर्फ काकासाहेब मुळे यांनी उत्तमप्रकारे चालविले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.

हिंदुस्थान सरकारचा आतापर्यंतचा इतिहास अवलोकन केला तर कर वसूल करणे कायदा व सुव्यवस्था पाहाणे ही दोनच ध्येये त्यांच्यापुढे होती. पण अलिकडे त्यात बदल झाला आहे. देशातील दारिद्र्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. ते दारिद्र्य नाहिसे करण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. हे कोणीही कबूल करील. दिल्लीत आज पुनर्घटनेचे कार्य जोरात सुरू आहे. राहाण्याची सोय, शिक्षण, उद्योगधंदे यांचे बाबतीत मध्यवर्ती सरकारची 90 टक्के शक्ती खर्च होत आहे. लोकलबोर्ड, म्युनिसीपालिट्या यांना मदत देऊन या गोष्टी अंमलात आणण्याची सक्ती करण्याचे धोरण आखले जाणार आहे.

मी अजून मंत्री आहे. मध्यवर्ती सरकारमार्फत मजुरांचे हिताकडे अधिकाधिक देण्यात येत आहे. 1930 साली या प्रश्नाबाबत रॉयल कमिशन नेमले होते. त्या कमिशनने सूचनाही होत्या. सालापासून सालापर्यंतचा इतिहास तर या दृष्टीने काहीच नाही. सालापासून मी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर 46 सालापर्यंत अवघ्या वर्षात प्रगती झालेली दिसेल. आत्मस्तुती नसून वस्तुस्थिती आहे. सालापासून आजतागायत मध्यवर्ती असेंब्लीत मजुरांचा प्रतिनिधी घेतला असे. आज तीन मजूर प्रतिनिधी नव्या असेंब्लीत असलेले तुम्हास दिसतील. कौन्सिल स्टेट्समध्ये आतापर्यंत एकही मजूर प्रतिनिधी घेतला नसे. यापुढे मजूर प्रतिनिधी घेण्यात येईल.

आगामी मध्यवर्ती असेंब्लीचे बैठकीत मजुरांचे हिताची बिले येणार असून ती ड्राफ्ट केली आहेत. यावरुन देशाचे सामाजिक आर्थिक दारिद्र्य दूर करण्याचे प्रयत्न चालू आहेत दिसून येईल.

देशातील सामाजिक परिस्थिती विचित्र झाली आहे. देशात कोटी मानवाचा विटाळ वाटणारे या देशात आहेत. उपजीविकेचे साधन म्हणून गुन्हेगारीचा करणारे लाख मानव देशात आहेत. आठ हजार वर्षापूर्वी देशात संस्कृती निर्माण झाली, असे इतिहास सांगतो. कपडे कसे घालावे, अन्न काय हे माहीत नाही, अशा स्थितीत राहाणारे लोकही कोट्यावधी आहेत. जगातील कोणत्याही देशात नाही, अशी गंभीर परिस्थिती आमच्या हिंदुस्थानात आहे. ज्यांचे नाड्यात सामर्थ्य आहे, त्यांचेवर ही जबाबदारी आहे. देशाचे स्वातंत्र्य हवे अशा गप्पा मारणाऱ्यांचेवर जबाबदारी जास्त आहे. ज्या देशात कोट्यावधी लोक अस्पृश्य गुन्हेगार मानले जातात त्यांना स्वातंत्र्य मागण्याचा हक्क कसा पोहोचतो ही जबाबदारी टाळता येणे शक्य नाही.

स्वराज्य मागणे फार सोपे आहे. मला प्रश्न विचारला जातो की, डॉक्टर साहेब, काँग्रेसमध्ये तुम्ही सामील का होत नाही ? मानसन्मान, दररोज वर्तमानपत्रातून ठळक जागी नाव छापून येईल.” मला ते मान्य नाही. बडबड करण्यापेक्षा कृतीची जरूरी असते. कुठेही मी गेलो तरी उद्वेग वाटण्यासारख्या या गोष्टी आहेत. अस्पृश्यता निवारण्याचे खरे कार्य मीच करीत आहे.

खरे म्हणजे हे कार्य स्पृश्य समाजातील पुढाऱ्यांचे आहे. इंग्रज लोकांजवळ स्वराज्य मागणाऱ्या लोकांनी आपल्या देशातील अस्पृश्यता निवारण्याचे कार्य प्रथम हाती घेतले पाहिजे. या स्वराज्य मागणाऱ्या लोकांबद्दल इंग्रज लोक अंतर्यामी काय बोलतात याची मला जाणीव आहे. अस्पृश्यता नष्ट होईल तितक्या लवकर स्वराज्य हाती येईल. त्याशिवाय स्वराज्य मिळणार नाही. हे निश्चित.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password