Categories

Most Viewed

02 जानेवारी 1945 भाषण

विद्यार्थ्यांनी शिक्षणापेक्षा राजकारणात दंग होणे हा शैक्षणिक -हास होय.

कलकत्ता येथे ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स स्टुडन्टस् फेडरेशनच्या वतीने तारीख 2 जानेवारी 1945 रोजी डॉ. बाबासाहेबांच्या सन्मानाप्रित्यर्थ जंगी सभा घेण्यात आली होती. त्या वेळी अखिल भारतीय दलितवर्ग विद्यार्थी संघाच्या सभेपुढे भाषण करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

विद्यार्थी वर्गाची शिक्षण संपादनाच्या दृष्टीने परिस्थिती बरीच खालावलेली आहे. मागील सालापेक्षा सरकारने सध्या बरीच रक्कम शिक्षणासाठी खर्च केली आहे. परंतु अलिकडे विद्यार्थी शिक्षणापेक्षा राजकारणातच जास्त दंग असलेले दिसून येतात, हा सुद्धा मी म्हणतो तसा शैक्षणिक -हास होय. ‘राजकारण हाच विद्यार्थी चळवळीचा हेतू होय ‘ हा बऱ्याच पुढाऱ्यांचा दृष्टिकोन आपल्याला मुळीच मान्य नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही काँग्रेसच्या ठरावाला पाठिंबा देण्यापलिकडे काहीच करीत नाही. त्यांच्या चर्चा विषयात काहीच नाविन्य नाही. म्हणून राजकारणापासून अलिप्त राहाण्यासाठी अस्पृश्य विद्यार्थ्यांनी आपली स्वतंत्र संघटना स्थापन केली पाहिजे. अस्पृश्य विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी फेडरेशनशी असलेले आपले संबंध तोडून टाकावे. विद्यार्थी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रश्नांकडे त्यांनी अधिक लक्ष पुरवावे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password