Categories

Most Viewed

04 डिसेंबर दिनविशेष

दिनांक 04 डिसेंबर 1938
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली मुंबई फोरास रोड, म्युनिसिपल सिमेंट चाळ क्रमांक 18 येथील मंडळीच्या विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात इमारत फंडाला मदत देण्याकरिता जाहीर सभा घेण्यात आली.

Date 04 December 1938
A public meeting was held under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai Foras Road, Municipal Cement Chawl No. 18 in support of the building fund.

दिनांक 04 डिसेंबर 1944
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर मुंबई सेंट्रलहून फ्रंटीयर मेलने दिल्लीस रवाना झाले.

Date 04 December 1944
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar left Mumbai Central for Delhi by Frontier Mail.

दिनांक 04 डिसेंबर 1954
श्री फुंग, व्हीचार्न ऑफ थायलंड यांच्या अध्यक्षतेखाली रंगून येथे तिसऱ्या जागतिक बौध्द धर्माच्या अधिवेशनात विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले.

Date 04 December 1954
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar addressed the Third World Convention on Buddhism in Rangoon under the chairmanship of Mr. Fung, Vicharn of Thailand.

दिनांक 04 डिसेंबर 1954
रंगून येथे वास्तव्य करीत असलेल्या आंध्र प्रदेशातील शेड्युलड कास्टस फेडरेशनच्या मंडळीनी विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार केला.

Date 04 December 1954
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was felicitated by a delegation of Scheduled Castes Federation of Andhra Pradesh residing at Rangoon.

दिनांक 04 डिसेंबर 2011
भारतीय बौद्ध महासभा, माटुंगा लेबर कॅम्प शाखा, भिमायान बुध्द विहारच्या सभागृहाचे जीर्णोद्धार उद्घाटन सोहळा ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय मनोहरजी रायबागे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

Date 04 December 2011
The renovation ceremony of the hall of Bhimayan Buddha Vihar, Matunga Labor Camp Branch, Indian Buddhist Mahasabha was inaugurated by Hon’ble Manoharji Raibage Saheb.

दिनांक 04 डिसेंबर 2015
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा यॉर्क विद्यापीठ, टोरंटो, कॅनडा येथे बसविण्यात आला.

Date 04 December 2015
A bust of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was erected at York University, Toronto, Canada.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password