दिनांक 27 नोव्हेंबर 1927
सोलापूर जिल्हा वतनदार महार परिषदेचे दुसरे अधिवेशन प्रसंगी सोलापूर मुक्कामी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नऊ ठराव पास करण्यात आले.
दिनांक 27 नोव्हेंबर 1944
पुण्यातील घोरपडे पेठेतील पां ना राजभोज यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना चहापार्टी दिली. याप्रसंगी त्यांनी गीता, वेद व बौद्ध धर्म यावर विवेचन केले.
दिनांक 27 नोव्हेंबर 1945
मजूरमंत्री विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत भरलेल्या सातव्या हिंदी कामगार परिषदेत मार्गदर्शन.
दिनांक 27 नोव्हेंबर 1945
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे सातवी हिंदी मजूर परिषद संपन्न झाली. त्यांनी आपल्या भाषणात सरकारची मजूर विषयक कर्तव्ये आणि मजुरांच्या राहणीचे मान वाढविण्या संबंधी सुस्पष्ट असे निवेदन केले.