Categories

Most Viewed

26 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 26 नोव्हेंबर 1927
सोलापूर जिल्हा वतनदार महार परिषदेचे दुसरे अधिवेशन सोलापूर मुक्कामी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

दिनांक 26 नोव्हेंबर 1927
सोलापूर मुक्कामी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई कौन्सिल मध्ये महार वतन दुरुस्ती बिल आणले होते त्याला पाठिंबा देण्याकरिता शेट माणेकचंद शहा यांच्या  अध्यक्षतेखाली त्या बिलास वतनदार महार परिषदेने आपला पूर्ण पाठींबा दिला.

दिनांक 26 नोव्हेंबर 1948
भारतीय संसदेत स्वतंत्र भारताची घटना संमत झाली.

दिनांक 26 नोव्हेंबर 1949
घटना खर्डा समितीचे अध्यक्ष विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीला सादर केलेली स्वतंत्र भारताची राज्यघटना घटना समितीने स्वीकृत केली.  याप्रसंगी घटना समितीचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद यांनी डॉ आंबेडकरांच्या घटना निर्मितीच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या भारतीय संविधानास मान्यता मिळाली.

दिनांक 26 नोव्हेंबर 1951
सर कावसजी जहांगीर हॉल, मुंबई येथे बॅरिस्टर पुरुषोत्तम त्रिकमदास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जंगी सभेत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवडणूक प्रचाराचे भाषण. त्यात त्यांनी सांगितले की, “सचोटी बाजूला ठेवून मी कृतज्ञ राहिलो, तर तो मानवी व्यक्तिमत्त्वाचा वध आहे असे मी समजेन.”

दिनांक 26 नोव्हेंबर 1956
महाबोधी सोसायटीने आयोजित सभेला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सारनाथ येथील मुलगंध कुटी विहाराच्या आवारात हजर राहिले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password