Categories

Most Viewed

24 नोव्हेंबर 1951 भाषण

हिंदू कोड बिल संमत व्हायलाच हवे.

दिनांक 24 नोव्हेंबर 1951, शनिवार रोजी सायंकाळी समाजवादी पक्ष आणि शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन यांच्या विद्यमाने दादर, मुंबई येथील महिलांच्या सभेत “हिंदू कोड बिल” या विषयावर सभा आयोजित होती. या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. सौ. काशीबाई अवसरे होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले.

“खुद्द पंडित नेहरूनी एक वेळ मला हिंदू कोड बिल लोकसमेतून गाळण्याची विनती केली होती. काँग्रेस हा राजकीय पक्ष आहे की धर्मशाळा आहे ? अन्यथा, एकाच संस्थेत नेहरू व अनंगशयनम् अय्यंगार नि पंडित गोविंद मालवीय ही मंडळी एकत्र कशी राहू शकतात ?” कोड बिलाने हिंदू स्त्रियांचा किती फायदा होणार आहे हे विषद करून आंबेडकर म्हणाले, “नेहरू बिलाचे बाजूने असोत वा विरोधी असोत, हे बिल संमत करून घेतल्याखेरीज मी स्वस्थ बसणार नाही. बिल गेल्या चार वर्षात केव्हाच पास झाले असते, पण नेहरूंनी ते मारून टाकले.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password