Categories

Most Viewed

24 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 24 नोव्हेंबर 1918
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे मुंबई येथे कामगार सभेत अध्यक्षीय भाषण.

Date 24 November 1918
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj’s Presidential Address at Kamgar Sabha in Mumbai.

दिनांक 24 नोव्हेंबर 1930
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केल्याप्रमाणे बहिष्कृत भारत या पत्राचे नामकरण जनता करण्यात येऊन जनता या साप्ताहिकाचा पहिला अंक मुंबई मधून प्रकाशित झाला.

Date 24 November 1930
As announced by Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, the letter ‘Bahishkrit Bharat’ was renamed as Janata and the first issue of Janata weekly was published from Mumbai.

दिनांक 24 नोव्हेंबर 1940
श्री सोमवंशीय समस्त मंडळ, चिखल पाडा, फोरास रोड, मुंबई यांचे तर्फे इमारत फंडास निधी अर्पण समारंभ विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. त्यात त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “आता पालवी फुटली आहे. उद्या फळे येण्याचा रंग दिसत आहे.”

Date 24 November 1940
On behalf of Shri Somvanshiya Samast Mandal, Chikhal Pada, Foras Road, Mumbai, the building fund raising ceremony was celebrated in a grand manner under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar. In it, he said in his presidential address, “Now the leaves have sprouted. Tomorrow the color of fruit is visible.”

दिनांक 24 नोव्हेंबर 1951
समाजवादी पक्ष आणि शेड्युलड कास्टस फेडरेशन यांच्या विद्यमाने दादर मुंबई येथील महिलांच्या सभेत ‘हिंदू कोड बिल’ विषयावर सभा आयोजित केली होती. त्या सभेस विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.

Date 24 November 1951
The Samajwadi Party and the Scheduled Castes Federation had organized a meeting on ‘Hindu Code Bill’ at a women’s meeting in Dadar, Mumbai. Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was present at that meeting.

दिनांक 24 नोव्हेंबर 1951
शेड्युलड कास्टस फेडरेशन आणि समाजवादी पक्षाच्या वतीने शिवाजी पार्क दादर मुंबई येथे निवडणूक प्रचाराची उद्या जंगी सभा होणार असून सभेत विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर आणि अशोक मेहता यांची भाषणे होतील. तत्पूर्वी भायखळा पासून प्रचंड मिरवणूक निघेल. त्यात सर्वांनी सामील व्हावे. असे पत्रक मुंबई दलित फेडरेशन शाखा यांच्या वतीने जनता अंकात प्रसिद्ध झाले होते.

Date 24 November 1951
On behalf of the Scheduled Castes Federation and the Samajwadi Party, a campaign rally will be held tomorrow at Shivaji Park, Dadar, Mumbai, with speeches by Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar and Ashok Mehta. Before that, a huge procession will leave Byculla. Everyone should join it. Such a leaflet was published in the Janata issue on behalf of the Mumbai Dalit Federation branch.

दिनांक 24 नोव्हेंबर 1956
काशी हिंदू विश्व विद्यालय संघाच्या द्वारे आयोजित आर्ट्स कॉलेजच्या मैदानात भरलेल्या सभेत विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “ब्रह्म सत्य जगत मिथ्या ही एक बौद्धिक लटपट आहे.”

Date 24 November 1956
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said in his speech at a meeting held in the grounds of Arts College organized by Kashi Hindu Vishwa Vidyalaya Sangh that “Brahma Satya Jagat Mithya is an intellectual lie.”

दिनांक 24 नोव्हेंबर 1956
विश्वरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकरांचे काशीहून सारनाथला आगमन. भिक्खुशी चर्चा करताना त्यांनी मुख्यत्वे करून, “प्रत्येक बौद्धाचे आद्य कर्तव्य आहे की, त्यांनी दर रविवारी नियमित रित्या बुध्द मंदिरात जाऊन उपदेश ग्रहण करावा” यावर जोर दिला.

Date 24 November 1956
Arrival of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar from Kashi to Sarnath. Discussing Bhikkhushi, he emphasized that “the first duty of every Buddhist is to go to the Buddha’s temple regularly every Sunday to receive instruction.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password