Categories

Most Viewed

20 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 20 नोव्हेंबर 1896
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गडहिंग्लज, रायबाग, कटकोळ इत्यादी दुष्काळग्रस्त भागांना भेट दिली.

Date 20 November 1896
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj visited the drought stricken areas like Gadhinglaj, Raibag, Katkol etc.

दिनांक 20 नोव्हेंबर 1906
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या फोटोचे दिगंबर जैन वस्तीगृहात अनावरण करण्यात आले.

Date 20 November 1906
A photo of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj was unveiled at Digambar Jain Hostel.

दिनांक 20 नोव्हेंबर 1919
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक वडील (चौथे शिवाजी) यांच्या पादुका आणि छत्री, अहमदनगर येथे मृत्यू पावलेले त्यांच्या दफनभूमीवर बांधण्याची शाहू महाराजांची योजना.

Date 20 November 1919
Shahu Maharaj’s plan to build the Paduka and Chhatri of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj’s adopted father (4th Shivaji) at his cemetery at Ahmednagar.

दिनांक 20 नोव्हेंबर 1919
वंशशास्त्राच्या आधारे हिंदू जातीचे वर्गीकरण आणि भारतातील प्राचीन मानव यांचा अभ्यास करणारा संशोधन प्रकल्प आराखडा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी तयार केला.

Date 20 November 1919
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj prepared a research project plan on the classification of Hindu castes on the basis of genealogy and the study of ancient humans in India.

दिनांक 20 नोव्हेंबर 1930
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या गोलमेज परिषदेत आपल्या पहिल्या भाषणात सांगितले की, “ब्रिटिश सरकार जोपर्यंत या देशात आहे, आमच्या हातात राजकीय सत्ता येणे शक्य नाही.”

Date 20 November 1930
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his inaugural address at the first Round Table Conference said, “As long as the British government is in this country, political power cannot come into our hands.”

दिनांक 20 नोव्हेंबर 1937
वडाळा मुंबई येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा सत्कार व मानपत्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “पुढाऱ्यांच्या निधनानंतरही समाजकार्य अव्याहत चालून ते चिरकाल टिकले पाहिजे.”

Date 20 November 1937
Karmaveer Dadasaheb Gaikwad was felicitated and honored under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at Wadala Mumbai. He later said in his speech that “social work should continue indefinitely even after the demise of the leader.”

दिनांक 20 नोव्हेंबर 1937
मुक्काम दोंड जिल्हा पुणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाल्या बाबत जनता अंकात प्रकाशित करण्यात आले.

Date 20 November 1937
It was published in the Janata Ank regarding the meeting held under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at Mukkam Dond District Pune.

दिनांक 20 नोव्हेंबर 1955
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथील महाविद्यालयात प्रा म भि चिटणीस लिखित ‘युग यात्रा’ या नाटकाचा प्रयोग पाहिला.

Date 20 November 1955
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar saw the play ‘Yug Yatra’ written by the M B Chitnis in the college at Aurangabad.

दिनांक 20 नोव्हेंबर 1956
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी काठमांडू येथील बौद्ध संघाच्या चौथ्या जागतिक परिषदेत “बुद्ध कि कार्ल मार्क्स” या विषयावर भाषण केले. त्यावेळी माईसाहेब आंबेडकर या सुद्धा उपस्थित होत्या.

Date 20 November 1956
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar addressed the 4th World Conference of the Buddhist Association in Kathmandu on “Buddha Ki Karl Marx”. Maisaheb Ambedkar was also present at that time.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password