Categories

Most Viewed

14 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 14 नोव्हेंबर 1912
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी संस्थानमध्ये मोटार वाहन सेवेला मान्यता दिली.

Date 14 November 1912
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj approved the motor vehicle service in the institute.

दिनांक 14 नोव्हेंबर 1918
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जिवलग मित्र आणि भावनगर राज्याचे महाराज भाऊसिंहजी महाराज यांच्या पत्नीचे निधन. त्यांच्या सांत्वनासाठी शाहू महाराजांची भावनगरला भेट.

Date 14 November 1918
Death of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj’s close friend and wife of Maharaj Bhausinhaji Maharaj of Bhavnagar state. Shahu Maharaj’s visit to Bhavnagar for his consolation.

दिनांक 14 नोव्हेंबर 1927
अमरावती येथील अस्पृश्य विद्यार्थी वर्गाकडून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र प्रदान करण्यात आले. मुलांच्या मानपत्राला उत्तर देताना त्यांनी शील कसे बनवावे तसेच कुळाला लागलेल्या अस्पृश्यतेचा डाग धुवून काढण्यास कशी मदत करावी हे विशद करून सांगितले. त्याच दिवशी मुंबईहून त्यांचे ज्येष्ठ बंधू श्री बाळाराम आंबेडकर यांच्या निधनाची बातमी तारेने येऊन धडकली.

Date 14 November 1927
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was honored by the untouchable students of Amravati. Responding to the children’s testimonials, he explained how to make a seal and how to help the family to wash away the stain of untouchability. On the same day, the news of the demise of his elder brother Shri Balaram Ambedkar came from Mumbai.

दिनांक 14 नोव्हेंबर 1937
आर्य द्रविड युवक संघातर्फे माटुंगा येथील बपू हॉलमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मानपत्राच्या उत्तरादाखल भाषण केले. त्यात त्यांनी सांगितले की, “आपले अस्तित्व स्वतंत्रपणे राखल्याशिवाय दुःखांना तोंड फोडता येणार नाही.”

Date 14 November 1937
Arya Dravid Youth Association addressed a meeting at Bapu Hall in Matunga under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar. In it, he said, “suffering cannot be faced without maintaining our existence independently.”

दिनांक 14 नोव्हेंबर 1949
भारतीय संविधानाच्या तृतीय वाचना करिता सभा भरली.

Date 14 November 1949
The meeting was convened for the third reading of the Indian Constitution.

दिनांक 14 नोव्हेंबर 1954
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांचे हैद्राबाद येथील बेगमपेठ विमानतळावर आगमन झाले. त्यांनी मराठवाडा साहित्य परिषद व मराठी ग्रंथसंग्रहालय संस्थांना भेट दिली. त्यानंतर त्यांनी विविध विषय आणी भाषावार प्रांतरचनेवर बोलताना सांगितले की, “राष्ट्राच्या लष्करी संरक्षणासाठी हैद्राबाद ही भारताची उपराजधानी असणे आवश्यक”.

Date 14 November 1949
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar and Maisaheb Ambedkar arrived at Begumpet Airport in Hyderabad. He visited Marathwada Sahitya Parishad and Marathi Library. He later said that Hyderabad should be the vice-capital of India for the military defense of the nation.

दिनांक 14 नोव्हेंबर 1954
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युलड कास्टस ट्रस्ट फंडतर्फे संचालित हॉस्टेलला भेट दिली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रचंड मेळाव्यापुढे भाषण केले.

Date 14 November 1954
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar visited the hostel run by the Scheduled Castes Trust Fund. He then addressed a large gathering of students.

दिनांक 14 नोव्हेंबर 1956
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतातील बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांना भेट देऊन कुशीनगर हुन दिल्लीला विमानाने परत आले.

Date 14 November 1956
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar returned to Delhi by plane from Kushinagar after visiting the sacred places of Buddhism in India.

दिनांक 14 नोव्हेंबर 2015
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेत असताना वास्तव केलेल्या घराचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकांर्पण करण्यात आले.

Date 14 November 2015
The house built by Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar while he was studying at the London School of Economics was inaugurated by the Prime Minister of India Narendra Modi.

दिनांक 14 नोव्हेंबर 2015
डॉ भीमराव रामजी आंबेडकर स्मारक, लंडन यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती आणि अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केले.

Date 14 November 2015
Dr. Bhimrao Ramji Ambedkar Memorial, London unveiled Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar full size and half size statue.

दिनांक 14 नोव्हेंबर 2016
डॉ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धीझम च्या विद्यमान आयोजित अकरावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद पूज्य भदंत करुणानंद महाथेरो (दिल्ली) यांच्या अध्यक्षतेखाली धम्माचल, अजिंठा लेणी, फर्दापूर, तालुका सोयगांव जिल्हा औरंगाबाद येथे संपन्न झाली. 

Date 14 November 2016
The eleventh All India Buddhist Dhamma Council organized by Dr. Babasaheb Ambedkar Research Institute of Pali and Buddhism was held at Dhammachal, Ajanta Caves, Fardapur, Taluka Soygaon District Aurangabad under the chairmanship of Pujya Bhadant Karunanand Mahathero (Delhi).

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password