Categories

Most Viewed

01 नोव्हेंबर दिनविशेष

दिनांक 01 नोव्हेंबर 1917
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात नर्सिग वर्ग सुरू केले.

Date 01 November 1917
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj started nursing classes in Kolhapur.

दिनांक 01 नोव्हेंबर 1940
इमारत व तिच्याकरिता जमवायचा फंड या विषयीची योजना यासंबंधी जंगी सभा चित्रा सिनेमाच्या पाठीमागे घेतलेल्या जागेवर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आली.

Date 01 November 1940
Jangi Sabha was held on the back of Chitra Cinema under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.

दिनांक 01 नोव्हेंबर 1956
भारतीय संविधान सातवे घटनादुरूस्ती करण्यात आली. राज्य सूचना आयोगाच्या सूचनानुसार बदल करण्यासाठी ही घटनादुरूस्ती करण्यात आली. देशातील प्रदेशांचे घटकराज्य व केंद्रशासित प्रदेश अशा दोन भागात विभाजन करण्यात आले. लोकसभेची रचना निश्चित करण्यात आली. प्रत्येक जनगणनेनंतर कोणते बदल करणे आवश्यक आहेत याविषयक तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे नवीन उच्च न्यायालये व न्यायाधीशाच्या नेमणुका याविषयी तरतूद करण्यात आली. सातव्या घटना दुरूस्ती अन्वये संसदेला दोन किंवा अधिक राज्यासाठी किंवा अधिक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. सातव्या घटना दुरुस्ती अन्वये (1956) एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची संमती प्रदान करण्यात आली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password