Categories

Most Viewed

28 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 28 ऑक्टोबर 1892
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची उत्तर हिंदुस्थानची दुसरी शैक्षणिक सहलीस सुरुवात. या सहलीत त्यांनी बडोदा, अहमदाबाद, अबू पहाड, जोधपुर, भरतपूर, दिल्ली, मथुरा, शरणपूर, हरिद्वार, अमृतसर पेशावर व कराची या शहरांना भेट दिली.

Date 28 October 1892
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj’s second educational trip to North India begins. He visited Baroda, Ahmedabad, Abu Pahad, Jodhpur, Bharatpur, Delhi, Mathura, Sharanpur, Haridwar, Amritsar, Peshawar and Karachi.

दिनांक 28 ऑक्टोबर 1932
मुंबईच्या अपोलो बंदर येथे सर कावसजी जहागीर हॉल मध्ये डॉ पी जी सोळंकी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईतील ऋषी समाजातर्फे मानपत्र देण्यात आले. त्यावेळी त्यांनी जाहीर सभेत सांगितले की, “संसारामध्ये मनुष्याला जी सुख-दुःखे भोगावी लागतात ती ईश्वरी इच्छेनेच येतात. दारिद्र्य हे आपणासाठीच आहे असे लोक मानतात. आपणास असे नीच मानण्याची वृत्ती सोडा. सहभोजन व मंदिरप्रवेश यांना माझा विरोध नाही. पण या प्रकाराने आपणास राजकीय हक्क मिळणार नाहीत. या पुढे जे कायदे व्हायचे ते अस्पृश्य वर्गाच्या संमतीनेच होतील ही एक समाज क्रांती आहे. आपल्याला संसार चालवण्याची आवश्यकता आहे. भाकर, अंगावर कपडा, रहावयास चांगली जागा आपणास मिळाली पाहिजे. अस्पृश्य वर्गातील जातिभेद नष्ट करा”.

Date 28 October 1932
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was felicitated by the Rishi Samaj of Mumbai under the chairmanship of Dr. P.G. Solanki Saheb at Sir Kavasji Jahagir Hall at Apollo Port, Mumbai. At that time, he said in a public meeting, “The joys and sorrows that man has to experience in the world come only by God’s will. People believe that poverty is for them. Let go of the attitude of despising you. I am not against communion and temple entry. But this way you will not get political rights. This is a social revolution. We need to run the world. Bread, clothing, and a good place to live. Destroy the caste system of the untouchables “.

दिनांक 28 ऑक्टोबर 1951
दयानंद कॉलेज जालंधर येथे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकाच्या वेळी विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आमचे सच्चे प्रतिनिधी विधानसभा आणि संसदेत असले तरच ते आपल्या हितासाठी लढा देतील”.

Date 28 October 1951
Speaking on the occasion of the first general election at Dayanand College, Jalandhar, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said, “Only if our true representatives are in the Assembly and Parliament will they fight for their interests.”

दिनांक 28 ऑक्टोबर 1954
मुंबईतील पुरंदरे स्टेडीयमवर शेड्युलड कास्टस  फेडरेशनच्या वतीने विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना 1 लाख 18 हजाराची थैली अर्पण करण्यात आली. परंतु ती सर्व रक्कम मुंबईला बांधण्यात येणाऱ्या इमारत खंडाला केल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “माझे आयुष्य तीन गुरु म्हणजे बुद्ध, कबीर आणि ज्योतिबा फुले आणि तीन उपास्य दैवत म्हणजे विद्या, स्वाभिमान आणि शील यांनी घडले आहे”.

Date 28 October 1954
One lakh Eighteen thousand bags were handed over to Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar on behalf of Scheduled Castes Federation at Purandare Stadium in Mumbai. But he declared that all the money was spent on the building to be constructed in Mumbai. At that time, he said in his speech, “My life is made up of three gurus, Buddha, Kabir and Jyotiba Phule, and three devotional deities, Vidya, Swabhiman and Sheel.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password