Categories

Most Viewed

26 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 26 ते 31 ऑक्टोबर 1916
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची नरेंद्र मंडळ परिषदेसाठी दिल्लीकडे प्रस्थान.

Date 26 to 31 October 1916
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj leaves for Delhi for Narendra Mandal Parishad.

दिनांक 26 ऑक्टोबर 1938
मध्यप्रांत वऱ्हाड प्रांतातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाला उद्देशून विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी हितोपदेश देताना म्हणाले की, “राजकारणात बोललेले जेव्हाच्या तेव्हा विसरले पाहिजे”.

Date 26 October 1938
Addressing a delegation of activists from Madhya Pradesh’s Varhad region, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said in a proverb that “whatever is said in politics should be forgotten whenever possible”.

दिनांक 26 ऑक्टोबर 1939
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी महायुद्धाचे संबंधित ठरावावरील झालेल्या चर्चेत सहभागी होताना विधिमंडळात भाषण केले.

Date 26 October 1939
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar addressed the legislature while participating in the discussion on the relevant resolution of the Great War.

दिनांक 26 ते 29 ऑक्टोबर 1951
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी पंजाब राज्यातील जालंधर, लुधियाना आणि पटियाळा येथे प्रचार दौरा केला.

Date 26 to 29 October 1951
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar campaigned for next year’s elections in Jalandhar, Ludhiana and Patiala in the state of Punjab.

दिनांक 26 ऑक्टोबर 1954
मुंबई प्रदेश अखिल भारतीय शेड्युल्यड कास्टस फेडरेशनचे अधिवेशन मुंबई येथील पुरंदरे स्टेडियमवर घेण्यात आले. त्यावेळी विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी परिषदेला मार्गदर्शन करताना म्हणाले की, “तुमची झोपडी जिवंत राहिली तर लोक तुमच्या आश्रयाला येतील”.

Date 26 October 1954
The convention of the Mumbai State All India Scheduled Castes Federation was held at the Purandare Stadium in Mumbai. At that time, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, while guiding the council, said, “If your hut survives, people will come to your shelter”.

दिनांक 26 ऑक्टोबर 2006
स्त्रियांच्या होणाऱ्या कौटुंबिक छळास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 व नियम 2006 संपूर्ण भारतात लागू केला.

Date 26 October 2006
To prevent domestic violence against women, the Central Government enacted the Protection of Women from Domestic Violence Act, 2005 and Rules 2006 throughout India.

 • Anil keshav Jadhav.
  October 26, 2021 at 9:26 am

  👍

  • Suresh Hire
   October 31, 2021 at 1:55 pm

   Dhanyawad.

Leave Your Comment

Your email address will not be published.*

Forgot Password