Categories

Most Viewed

23 ऑक्टोबर दिनविशेष

दिनांक 23 ऑक्टोबर 1897
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरातील प्लेगच्या साथीबाबत जाहीर निवेदन प्रसिद्ध केले.

Date 23 October 1897
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj issued a public statement regarding the plague in Kolhapur.

दिनांक 23 ऑक्टोबर 1928
सायमन मंडळ, केंद्रीय समिती आणि मुंबई प्रांतिक समिती यांनी पुणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे साक्ष घेतली. या तिन्ही समित्यांच्या बैठकीपुढे बहिष्कृत हितकारणी सभेने डिप्रेस्ड इंडिया असोसिएशनने सादर केलेली दोन निवेदने होती.

Date 23 October 1928
The Simon Mandal, the Central Committee and the Mumbai Provincial Committee testified against Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at Pune. The meeting of these three committees was preceded by two statements submitted by the Depressed India Association by the expelled beneficiaries.

दिनांक 23 ऑक्टोबर 1929
स्टार्ट कमिटीबरोबर विश्वरत्न डाॅ आंबेडकर बेळगाव, नाशिक व खानदेशच्या दौ-यावर असताना चाळीसगाव येथील अस्पृश्यांनी त्यांचे स्वागत करुन आपल्या वस्तीत न्यावे म्हणून टांगा हवा होता. पण अस्पृश्य असल्याने एकही टांगेवाला त्यांना नेण्यास तयार होईना. शेवटी एका अस्पृश्याने टांगा हाकावा या अटीवर टांगा ठरविण्यात आला. टांगा हाकणारा नवीन असल्याने घोडा उधळला व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टांग्याबाहेर फेकले जाऊन दगडावर आदळले. त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला त्यामुळे ते डिसेंबरपर्यंत जायबंदी होऊन राहीले.

Date 23 October 1929
While Vishwaratna Dr. Ambedkar was on a tour of Belgaum, Nashik and Khandesh with the Start Committee, the untouchables from Chalisgaon wanted to welcome him and take him to their hometown. But being untouchable, not a single Tangewala was willing to take them. In the end, it was decided that an untouchable should be hanged. As the rider was new, the horse got lost and Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was thrown out of the tank and hit a rock. He suffered a fractured right leg, which left him paralyzed until December.

दिनांक 23 ऑक्टोबर 1956
“बौध्द धर्माचा ऱ्हास कसा झाला ?” यावर दिल्लीत विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले.

Date 23 October 1956
“How did Buddhism decline?” Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar spoke on this in Delhi.

दिनांक 23 ऑक्टोबर 1976
अंबरनाथ नगरपालिका परिषद येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय आमदार श्री बाळासाहेब सावंत यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले.

Date 23 October 1976
The unveiling of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar statue at Ambernath Municipal Council was inaugurated under the chairmanship of Maharashtra Chief Minister Shankarraoji Chavan and Maharashtra Pradesh Congress Committee Chairman Hon’ble MLA Shri Balasaheb Sawant.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password