Categories

Most Viewed

16 ऑक्टोंबर 1956 भाषण

बुद्धं सरणं गच्छामि

चंद्रपूर (महाराष्ट्र) या शहरात दीक्षा समारंभ दिनांक 16 ऑक्टोबर 1956 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते व्हावा, असा कार्यक्रम ठरला होता. त्या कार्यक्रमासाठी बाबासाहेब, माईसाहेब, नानकचंद रत्तू व बॅ. राजाभाऊ खोब्रागडे हे 16 ऑक्टोबरलाच सकाळी पाच वाजता नागपूरहून निघाले. चंद्रपूरवरून देवाजी खोब्रागडे आणि ज. गो. सन्त गुरुजी अगोदरच मूलला आले होते. त्यांनी बाबासाहेबांची मूलच्या सरकारी रेस्ट हाऊसमध्ये व्यवस्था केली होती. त्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर दुपारच्या सुमारास मूलवरून सरळ चंद्रपूरच्या सरकारी सर्किट हाऊसवर बाबासाहेब आले. तेव्हा दुपारचे चार वाजले होते.

दीक्षा मंडपात व बाहेर लाखो लोक उपस्थित होते. सायंकाळी सात वाजता बाबासाहेब नियोजित धम्मदीक्षेच्या स्थळी आले. त्यांच्या उजव्या हातात काठी होती. ते व्यासपीठावर येताच लाखो लोकांनी उभे राहून बाबासाहेबांचे स्वागत केले. बाबासाहेबांच्या जयजयकाराने वातावरण दुमदुमून गेले. लोकांचा उत्साह पाहून बाबासाहेबांनी त्यास प्रतिसाद देण्यासाठी हात उंचावला आणि नंतर काठीच्या आधाराने ते खुर्चीत बसले.

बुद्ध प्रतिमेच्यासमोर मेणबत्ती व अगरबत्ती लावण्यात आली. फुले वाहण्यात आली. त्यानंतर अनेक संस्थाच्या वतीने बाबासाहेबांना पुष्पहार बुद्ध प्रतिमेला अर्पण करण्यात आले. लाखो लोक दीक्षा घेण्यासाठी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आले होते. त्यावेळी असे सांगण्यात आले की, चंद्रपूरच्या बाजारपेठेतील पांढरे कापड हा हा म्हणता संपून गेले होते. पांढऱ्या कपड्यातील स्त्री-पुरुषांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद दिसत होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित लोकांना "बुद्धं सरणं गच्छामि" त्रिसरण पंचशील आणि 22 प्रतिज्ञा दिल्या. याप्रमाणे धम्मदीक्षा दिली. अशाप्रकारे चंद्रपूरला तीन लाख लोकांनी बाबासाहेबांच्या हस्ते धम्मदीक्षा घेतली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password