Categories

Most Viewed

15 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 15 ऑक्टोबर 1896
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आहिल्याबाई राणीसाहेबांच्या स्मरणार्थ देशी दवाखाना सुरू केला.

Date 15 October 1896
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj started a desi hospital in the memory of Ahilyabai Ranisaheb.

दिनांक 15 ऑक्टोंबर 1931
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत 35व्या बैठकीत फेडरल स्ट्रक्चर कमिटीमध्ये आपले मत व्यक्त केले.

Date 15 October 1931
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar expressed his views in the 35th meeting of the Round Table Conference in the Federal Structure Committee.

दिनांक 15 ऑक्टोबर 1941
अस्पृश्य वर्गाला मध्यवर्ती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व न दिल्याविषयी काही बदल घडवून आणता यावा यासाठी विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर कराची मार्गे लंडनला रवाना झाले.

Date 15 October 1941
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar left for London via Karachi to make some changes to ensure that the untouchables were not adequately represented in the new cabinet of the central government.

दिनांक 15 ऑक्टोबर 1956
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचा नागपूर पालिकेतर्फे जाहीर सत्कार करण्यात येऊन महापौर समर्थ यांचे हस्ते मानपत्र अर्पण करण्यात आले. मानपत्राच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “काँग्रेस नेत्यांनी राजकारणाचा बट्ट्याबोळ केला आहे. जर सध्या अधिकारावर असलेला पक्ष बराच काळ सत्तेवर राहील तर देश पेटेल. राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून ती कशी राबवली जाते आणि तिची परिणती भारतात लोकशाही स्थापण्यात होईल की नाही याविषयी मी सदोदित विचार करून असतो. मी सरकार जवळून पाहिले आहे. सुशिक्षित स्त्रिया वाममार्गास लागल्या आहेत आणि निवडणुकीचे तिकीट मिळविण्यासाठी त्या वाटेल ते करतील”.

Date 15 October 1956
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was felicitated by Nagpur Municipality and honored by Mayor Samarth. In a speech in response to the award, he said, “Congress leaders have squandered politics. If the ruling party stays in power for a long time, the country will burn. As the architect of the Constitution, I am constantly thinking about how it is implemented and whether it will result in the establishment of democracy in India. I have watched the government closely. “Educated women are on the left and they will do whatever they want to get election tickets.”

दिनांक 15 ऑक्टोबर 1956
मध्य प्रदेश दलित फेडरेशन शाखेच्या वतीने सायंकाळी विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ, नागपूर मधील श्याम हॉटेल मध्ये छोटीशी पार्टी देण्यात आली. या समारंभास माईसाहेब, बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, दादासाहेब गायकवाड, हरिदास आवळेबाबू, आर डी भंडारे, बी सी कांबळे तसेच अन्य मान्यवर हजर होते.
त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना उपदेशपर हिंदी भाषणात सांगितले की, “मला धर्म जास्त प्यारा आहे आणि त्यासाठीच मी माझी शक्ती वेचणार आहे”.

Date 15 October 1956
On behalf of Madhya Pradesh Dalit Federation Branch, a small party was organized in the evening at Shyam Hotel in Nagpur in honor of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar. The ceremony was graced by Maisaheb, Ba. Rajabhau Khobragade, Dadasaheb Gaikwad, Haridas Awalebabu, RD Bhandare, BC Kamble and other dignitaries were present on the occasion. At that time, he told the activists in a preaching Hindi speech, “I love religion more and that is why I am going to sell my strength”.

दिनांक 15 ऑक्टोंबर 2002
डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 2 (1937-1945) ची प्रथम आवृत्तीच्या तीस हजार प्रती प्रकाशित करण्यात आल्या.

Date 15 October 2002
Thirty thousand copies of the first edition of Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches Volume 18 Part 2 (1937-1945) were published.

दिनांक 15 ऑक्टोबर 2019
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अँड प्रकाश आंबेडकर साहेब यांची सोमय्या मैदान सायन मुंबई येथे विधानसभा प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न झाली.

Date 15 October 2019
Adv. Prakash Ambedkar, the founder of the Deprived Bahujan Aghadi, held a public meeting at Somaiya Maidan, Sion, Mumbai to campaign for the Assembly.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password