Categories

Most Viewed

13 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 13 ऑक्टोंबर 1929
पुण्याच्या प्रसिद्ध पर्वतीच्या मंदिरातील दैवताची पूजाअर्चा करण्याचा अस्पृश्यांचा हक्क प्रस्थापित करण्याकरिता सत्याग्रह समितीचे अध्यक्ष शिवराम जानबा कांबळे आणि सेक्रेटरी पां ना राजभोज यांच्या अधिपत्याखाली सत्याग्रहास सुरुवात झाली.

Date 13 October 1929
The Satyagraha began under the leadership of Shivram Janba Kamble, Chairman of the Satyagraha Committee and Secretary P. N. Rajbhoj to establish the right of the untouchables to worship the deity in the famous Parvati temple in Pune.

दिनांक 13 ऑक्टोबर 1935
नाशिक जिल्ह्यातील येवले येथे विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अखिल मुंबई इलाखा परिषदेत (धर्मांतर परिषद म्हणून प्रसिध्द) विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली की, “माझ्या दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू म्हणून मी जन्माला आलो. ही उणीव दूर करण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. परंतु अस्पृश्य म्हणून मला भोगाव्या लागणा-या अपमानास्पद नियमांपुढे मान वाकवण्याचे नाकारण्याचे, हिंदू धर्माचा त्याग करण्याचे माझ्या स्वाधीनच आहे. मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.” या परिषदेचे स्वागताध्यक्ष विंचूरचे अमृतराव रणखांबे होते.

Date 13 October 1935
At the All Mumbai Ilakha Parishad (known as Dharmantar Parishad) held under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at Yeola in Nashik district, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar announced that, “Unfortunately, I was born as an untouchable Hindu. I do not have the strength to overcome this shortcoming. But as an untouchable, I am free to refuse to bow before the abusive rules I have to face, to renounce Hinduism. Even though I was born as an untouchable Hindu, I am a Hindu.” So don’t die.” The receptionist of this conference was Amrutrao Ranakhambe of Vinchur.

दिनांक 13 ऑक्टोबर 1946
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचा ‘हू वेअर द शूद्राज’ ? हा ग्रंथ प्रकाशित झाला.

Date 13 October 1946
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar’s ‘Who Wear the Shudraj’? This book was published.

दिनांक 13 ऑक्टोबर 1956
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना सांगितले की, भगवान बुद्धाने जी धर्मतत्वे उपदेशिली आहेत, तीच मी पाळणार आहे. हिनयान आणि महायान ह्या बौद्ध धर्मातील पंथामुळे जे मतभेद झाले आहेत, त्यांपासून मी माझ्या लोकांना अलिप्त ठेवणार आहे. आपला बौद्ध धर्म म्हणजे एक प्रकारचा नवबौद्ध धर्म किंवा नवायान आहे.”

Date 13 October 1956
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar told the reporters that he would follow the principles taught by Lord Buddha. I will keep my people aloof from the differences that have arisen over the Hinayana and Mahayana sects of Buddhism. Our Buddhism is a kind of neo-Buddhist or neo-Yaan.”

  • Rajendra
    October 13, 2021 at 12:24 pm

    जयभीम

Leave Your Comment

Your email address will not be published.*

Forgot Password