Categories

Most Viewed

08 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 08 ऑक्टोबर 1919
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी मागासलेल्या जातीतील विद्यार्थीनीना मोफत शिक्षण आणि मोफत वसतिगृहाची सोय केली जाईल असा जाहीरनामा काढला.

Date 08 October 1919
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj issued a manifesto stating that free education and free hostel would be provided to the backward caste students.

दिनांक 08 ऑक्टोबर 1920
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुणे येथील छत्रपती मराठा बोर्डिंग इन्स्टिट्यूशन यास दरसाल 1000/- रुपयाचे अनुदान मंजूर केले.

Date 08 October 1920
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj sanctioned a grant of Rs.1000 / – per annum to Chhatrapati Maratha Boarding Institution at Pune.

दिनांक 08 ऑक्टोबर 1928
अस्पृश्य समाजातील लोकांना मुलांच्या दुय्यम शिक्षणावर होणारा खर्च घेण्यासारखा नसल्याने, त्या मुलांची सोय व्हावी म्हणून दलित वर्ग शिक्षण संस्थेने छात्रालय उघडण्याचे कार्य हाती घेतले होते. त्या कार्याला सहाय्य करण्याविषयी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारला कळकळीने आव्हान केले होते. दुय्यम शिक्षण घेणाऱ्या केवळ अस्पृश्य वर्गीय मुलांच्या उपयोगाकरिता म्हणून पाच छात्रालयांच्या योजनेस मान्यता देऊ अशी राज्यपालांनी घोषणा केली.

Date 08 October 1928
The Dalit class education institute had undertaken the task of opening a hostel for the benefit of the untouchables as they could not afford to pay for the secondary education of the children. Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar had strongly challenged the government to assist in that work. The governor announced that he would approve the scheme of five dormitories for the benefit of untouchable children pursuing secondary education only.

दिनांक 08 ऑक्टोबर 1931
राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘गांधीनी कराराचा भंग केला आहे. कोणाही प्रतिनिधींनी प्रक्षोभ निर्माण होईल असे काही बोलावयाचे नाही, असे ठरले असताना नुसती तहकुबीची सुचना मांडण्याऐवजी त्यांनी प्रतिनिधीच्या व शिंतोडे उडवण्याचा प्रारंभ केला. आम्ही सरकार नियुक्त आहोत ही गोष्ट आम्ही मान्य करीत नाही. परंतु माझ्यापुरते बोलायचे तर मी असे सांगतो की, भारतातील अस्पृश्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्यास सांगितले तरी, माझे स्थान त्यात अढळच राहील. मी सरकारनियुक्त असो वा नसो, मी माझ्या अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी आहेच आहे याविषयी कोणीही शंका बाळगू नये’.

Date 08 October 1931
In the round table conference, Vishwaratna Dr. In his speech, Babasaheb Ambedkar said, ‘Gandhi has violated the agreement. When it was decided that none of the delegates would say anything that would cause a commotion, instead of simply suggesting Tahkubi, he started hurling insults at the delegates. We do not accept that we are government appointed. But for me, I would say that even if the untouchables in India are asked to elect their representatives, my position will remain the same. No one should doubt that whether I am a government appointee or not, I am a representative of my untouchable class. ‘

दिनांक 08 ऑक्टोबर 1931
राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये जातीय प्रश्नावर सर्व संमत समेट घडवून आणण्यात आपण संपूर्णतया अपयशी ठरलो आहोत असे गांधीजींनी अल्पसंख्याक समितीला मोठ्या खिन्नतेने कबुली दिली. आपल्या अपयशाचे खरे कारण भारतीय प्रतिनिधींच्या रचनेतच अंगभूत आहे. परिषदेस आलेले प्रतिनिधी हे त्यांच्या पक्षाचे व समूहाचे खरे प्रतिनिधी नाही म्हणून समितीचे काम बेमुदत तहकूब करावे अशी गांधीजीनी सूचना पुढे आणली.

Date 08 October 1931
Gandhiji lamented to the Minorities Committee that he had completely failed to reach a consensus on the caste issue at the Round Table Conference. The real reason for our failure lies in the composition of the Indian delegation. Gandhiji suggested that the work of the committee should be postponed indefinitely as the delegates to the council were not the true representatives of his party and group.

दिनांक 08 ऑक्टोबर 1936
जळगांव येथील म्युनिसिपल टाऊन हॉलमध्ये विश्वरत्न डाॅ  बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “अंध व स्वार्थी दृष्टी ठेवली तर सर्व समाजाचाच घात होईल.”

Date 08 October 1936
In his speech at the Municipal Town Hall in Jalgaon, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said, “If we keep a blind and selfish eye, the whole society will be harmed.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password