Categories

Most Viewed

05 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 05 ऑक्टोंबर 1927
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात मुंबई विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयकावर चर्चा केली.

Date 05 October 1927
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar discussed the Mumbai University Law Amendment Bill in the Mumbai Legislature.

दिनांक 05 ऑक्टोबर 1953
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे मिरत येथे भव्य स्वागत करून इमारत फंडासाठी थैली अर्पण करण्यात आली.

Date 05 October 1953
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was given a grand welcome at Mirat and a bag was donated for the building fund.

दिनांक 05 ऑक्टोबर 1953
मीरत येथे झालेल्या जाहीर सभेत अस्पृश्यांना उद्देशून विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कि, “जातीभेद व अस्पृश्यता नष्ट करण्याची तळमळ न बाळगणाऱ्या राजकीय पक्षांपासून सावध रहा.”

Date 05 October 1953
Addressing the untouchables at a public meeting at Meerut, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said, “Beware of political parties which are not keen on eradicating casteism and untouchability.”

दिनांक 05 ऑक्टोंबर 1956
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देवप्रिय वालीसिंह यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, “जर दीक्षा समारंभ संबंधित तुमच्या आमच्यात काही मतभेद असले, तर ते मिटवण्यासाठी नागपूरला समारंभाच्या पूर्वी यावे”

Date 05 October 1956
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar wrote in a letter to Devapriya Walisingh, “If you have any differences between us regarding the initiation ceremony, come to Nagpur before the ceremony to resolve them.”

दिनांक 05 ऑक्टोंबर 1963
भारतीय संविधानाच्या 124, 128, 217, 222, 225-क, 226, 297 व 311 कलमांमध्ये दुरुस्ती करण्यात आली.

भारतीय संविधान 15 वे घटनादुरूस्ती  करण्यात आली. या घटनादुरूस्तीनुसार एका उच्च न्यायालयातून दुसर्‍या उच्च न्यायालयात बदली झालेल्या न्यायाधीशांसाठी खास भत्ता मान्य करण्यात आला. उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीवयात वाढ करण्यात आली. निवृत्त न्यायालयात पुनरनियुक्त करण्याचे अधिकार या दुरूस्ती नुसार सरकारला देण्यात आले. लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाच्या अनुपस्थित आयोगाच्या इतर सभासदास आयोगाचे अध्यक्ष पद देण्याविषयी तरतूद करण्यात आली.

दिनांक 05 ऑक्टोंबर 1963
भारतीय संविधान 16 वे दुरुस्ती विधेयक (बिल) संमत करण्यात आले.
संविधानाच्या 19 नंबरच्या कलमात ‘भारताचे सार्वभौमत्व व अखंडतेसाठी’ पुरेसे अधिकार उपलब्ध केले गेले. याशिवाय 84 व 173 क्रमांकाच्या कलमांत दुरुस्ती करून राज्य विधानसभा व संसदीय उमेदवारांस भारताचे सार्वभौमत्व व अखंडता रक्षणाची शपथ सक्तीची केली गेली.
भारतीय संविधान 16 वे घटनादुरूस्ती करण्यात आली. घटनेच्या 19 व्या कलमात भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण मार्गाने एकत्र येण्याचे स्वातंत्र्य यांवर देशाचे प्रादेशिक ऐक्य अबाधित राखण्यासाठी निर्बंध आणले. संसद/ राज्य विधिमंडळातून निवडून आल्यानंतर शपथ घेताना देशाचे सार्वभौमत्व व प्रादेशिक एकात्मता अबाधित ठेवण्याची अट मान्य करण्यात आली. ही घटनादुरूस्ती प्रादेशिक ऐक्य व अखंडत्व टिकून राहावे यासाठी करण्यात आली.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password