Categories

Most Viewed

03 ऑक्टोंबर दिनविशेष

दिनांक 03 ऑक्टोबर 1918
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी ‘डेक्कन रयत’ हे इंग्रजी साप्ताहिक सुरू केले. त्याचे संपादक वालचंद कोठारी यांना करण्यात आले.

Date : 03 October 1918
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj started an English weekly called ‘Deccan Rayat’. Its editor was Walchand Kothari.

दिनांक 03 ऑक्टोबर 1920
पुण्यातील शिवाजी मेमोरियल सोसायटीची वार्षिक सभा छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली सुरू असताना लोकमान्य टिळकांच्या अनुयायांनी सभेत गोंधळ घातला.

Date : 03 October 1920
While the annual meeting of Shivaji Memorial Society in Pune was being held under the chairmanship of Chhatrapati Shahu Maharaj, the followers of Lokmanya Tilak caused a commotion in the meeting.

दिनांक 03 ऑक्टोंबर 1927
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधिमंडळात मुंबई युनिव्हर्सिटी कायदा दुरुस्ती बिल तीन मांडले.

Date : 03 October 1927
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar introduced the Mumbai University Act Amendment Bill III in the Mumbai Legislature.

दिनांक 03 ऑक्टोबर 1933
संयुक्त समितीच्या कार्यास प्रारंभ झाला. तेव्हा डॉक्टर जयकर आणि सर मनुभाई यांनी काही ब्रिटिश प्रतिगाम्यांची उलट तपासणी घेण्याचे नाकारले. ब्रिटिश लोकसभेत चर्चिल यांनी नुकत्याच केलेल्या एका भाषणाचा उल्लेख करून, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विन्स्टन चर्चिल साहेबांना सळो की पळो करून सोडले.

Date : 03 October 1933
The work of the Joint Committee began. At that time, Dr. Jayakar and Sir Manubhai refused to cross-examine some of the British reactionaries. Referring to a recent speech by Churchill in the British Lok Sabha, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar released Winston Churchill.

दिनांक 03 ऑक्टोबर 1944
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे पूना एक्सप्रेसने मुंबईत आगमन झाले. त्यांचे दादर स्टेशनवर प्रचंड स्वागत करण्यात येऊन मिरवणुकीने राजगृह या निवासस्थानी नेण्यात आले.

Date : 03 October 1944
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar arrived in Mumbai by Poona Express. He was given a warm welcome at Dadar station and was taken in procession to his residence at Rajgruh.

दिनांक 03 ऑक्टोबर 1945
पुणे येथील अहिल्याश्रमाचे जागेत आंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स या संस्थेचा उद्घाटन समारंभ विश्वरत्न डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांचे हस्ते मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “व्यक्ती मात्राच्या स्वातंत्र्याचे मापन करण्याचे मूलभूत माप म्हणजे राजकारण होय”.

Date : 03 October 1945
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar inaugurated the Ambedkar School of Politics at Ahilya Ashram in Pune. At the time, he said in his speech that “politics is the fundamental measure of individual quantitative freedom.”

दिनांक 03 ऑक्टोबर 1945
ऑल इंडिया शेड्युल्ड कास्टस फेडरेशनच्या वर्किंग कमिटीची बैठक पुण्याच्या अहिल्याश्रमाच्या हॉलमध्ये एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत वर्किंग कमिटीने अत्यंत महत्वाचे सात ठराव पास करण्यात आले. संपूर्ण बैठकीत विश्वरत्न डाॅ  बाबासाहेब आंबेडकर हजर होते.

Date : 03 October 1945
The meeting of the working committee of the All India Scheduled Castes Federation was held in the hall of Ahilya Ashram in Pune under the chairmanship of N Shivraj. In this meeting, the working committee passed seven very important resolutions. Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was present in the entire meeting.

दिनांक 03 ऑक्टोबर 1949
विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर श्रीनगरहून दिल्लीला परतले.

Date : 03 October 1949
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar returned to Delhi from Srinagar.

दिनांक 03 ऑक्टोबर 1954
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ऑल इंडीया रेडीओवर ‘माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान’ या विषयावर भाषण केले.

Date : 03 October 1954
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar spoke on All India Radio on All India Radio on the subject of ‘Philosophy of My Life’.

दिनांक 03 ऑक्टोंबर 1957
भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. एन शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

Date : 03 October 1957
The Republican Party of India was formed. N Shivraj was elected party president.

दिनांक 03 ऑक्टोंबर 1957
रिपब्लिकन पक्षाने बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरिता बौद्ध महासभेचे पहिले अधिवेशन भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे घेतले. यावेळी चार ठराव पास केले.
अ) बौद्धधर्म स्वीकारलेल्या स्पृश्यास्पृश्यांना शैक्षणिक व नोकरीविषयक सवलती देण्याविषयी मागणी करणे.
ब) बुद्धजयंती व आंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्याविषयी मागणी करणे.
क) दिक्षाभूमी बुद्धविहारासाठी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी निधी देण्यात यावा.
ड) बौद्धांवरील अन्याय-अत्याचाराविषयी चौकशी करण्याची शासनाला विनंती करणे इत्यादी मागण्या करणे. तसेच या काळात बौद्ध धम्म दिक्षेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याचा फायदा महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील लाखो लोकांना झाला व अनेकांनी बौद्ध धम्माची दिशा घेतली.

Date : 03 October 1957
The Republican Party convened the first session of the Buddhist General Assembly in Nagpur under the chairmanship of Bhaiyasaheb Ambedkar to promote Buddhism. This time four resolutions were passed.
A) To demand educational and job concessions for the untouchables who have converted to Buddhism.
B) Demanding declaration of public holiday on Buddha Jayanti and Ambedkar Jayanti.
C) For Dikshabhoomi Buddha Vihara and Dr. Funds should be provided for the memorial of Babasaheb Ambedkar.
D) To request the government to inquire into the injustice and atrocities against the Buddhists, etc.
Also during this period, Buddhist Dhamma Diksha programs were organized. It benefited millions of people in Maharashtra and Madhya Pradesh and many took the path of Buddhism.

दिनांक 03 ऑक्टोंबर 1957
नागपूर येथे बॅ राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशचे अखेरचे अधिवेशन भरले. यावेळी त्यांनी शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन बरखास्त होत असून रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यात येत आहे असे जाहीर केले.

Date : 03 October 1957
The last convention of the Scheduled Castes Federation was held at Nagpur under the chairmanship of Br. Rajabhau Khobragade. This time, he announced that the Scheduled Castes Federation was being disbanded and that a Republican Party was being formed.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password