Categories

Most Viewed

28 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 28 सप्टेंबर 1919
सरकारी शाळेत अस्पृश्य आणि स्पृश्य मुलांना समान वागणूक दिली जावी म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कायदा केला.

Date 28 September 1919
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj enacted a law to treat untouchable and untouchable children equally in government schools.

दिनांक 28 सप्टेंबर 1931
अल्पसंख्यांक समितीच्या कार्यास प्रारंभ झाला.
मुसलमान आणि गांधीजी यांच्या गुप्त खलबतांचा वास आंबेडकरांना लागला होता. म्हणून आगाखान यांच्या सूचनेच्या विषयी बोलताना ते म्हणाले, अस्पृश्य वर्गाच्या विषयी म्हणाल तर गेल्या परिषदेत अल्पसंख्यांक उपसमितीला आम्ही आमच्या मागण्या यापूर्वी सादर केल्या आहे. या अल्पसंख्यांक समितीपुढे आम्ही आता एकच गोष्ट विचारा करिता ठेवणार आहोत ते म्हणजे आम्हाला एक प्रांतात प्रतिनिधींच्या संख्येचे प्रमाण किती असावे ही जातीय प्रश्न तडजोडीने निघण्यासाठी आणखी वाटाघाटी व्हायच्या आहेत हे ऐकून मला आनंद होत आहे.

Date 28 September 1931
The work of the Minority Committee began.
Ambedkar smelled the secret fervor of Muslims and Gandhiji. So speaking of Aga Khan’s suggestion, he said, “As for the untouchables, we have already presented our demands to the Minorities Subcommittee at the last conference. The only thing we are going to put before this minority committee now is that we are happy to hear that we need to have more negotiations to resolve the ethnic issue of how many delegates we should have in a province.

दिनांक 28 सप्टेंबर 1932
मुंबईतील वरळी बीडीडी चाळी जवळील मैदानात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “देवालयात गेल्याने तुमचा उद्धार होणार नाही.”

Date 28 September 1932
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his speech at the ground near Worli BDD Chali in Mumbai said, “Going to the temple will not save you.”

दिनांक 28 सप्टेंबर 1944
राजमहेंद्री येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र अर्पण करण्यात आले. उत्तरादाखल भाषणात ते म्हणाले की, गांधींना वर्णाश्रम धर्म नष्ट करावयाचा नाही. त्यांना दूरदृष्टी मुळीच नाही.

Date 28 September 1944
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was honored at Rajahmundry. In his reply, he said that Gandhi did not want to destroy Varnashram Dharma. They have no vision at all.

दिनांक 28 सप्टेंबर 1951
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या मान्यतेवरून आपला राजीनामा पंतप्रधान नेहरु यांना सोपविला.

Date 28 September 1951
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar handed over his resignation to Prime Minister Nehru on the approval of the Hindu Code Bill.

दिनांक 28 सप्टेंबर 1952
शेड्युल्ड कास्टस फेडरेशन, शेड्युल्ड कास्टस इंप्रुव्हमेंट ट्रस्ट, म्युनिसिपल कामगार संघ, महार ज्ञाती पंचायत आणि समता सैनिक दल या पाच संस्थातर्फे नरे पार्कवर मुंबईतील अस्पृश्य जनतेच्या जाहीर संमेलनात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “सार्वजनिक पैशाचा अपहार करण्यासाठी नीच कृत्य दुसरे नाही.”

Date 28 September 1952
Speaking at a public meeting of untouchables in Mumbai at Nare Park on behalf of the Scheduled Castes Federation, Scheduled Castes Improvement Trust, Municipal Workers Union, Mahar Jnati Panchayat and Samata Sainik Dal, Vishwaratna Dr Babasaheb Ambedkar said, “The despicable act of embezzling public money is second to none.”

दिनांक 28 सप्टेंबर 2003
भारतीय संविधान 89 वी घटनादुरूस्ती करण्यात आली. 338 व्या कलमात दुरूस्ती करून राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगामध्ये चेयरमन, व्हाईस चेयरमन आणि तीन सदस्य यांची नेमणूक करण्याचा आधिकार राष्ट्रपतीस देण्यात आला. 338 व्या कलमातुन अनुसूचीत जमाती हा शब्द वगळण्यात आला. 338 ए हे कलम नव्याने समाविष्ट करण्यात आले. आणि त्यातील तरतुदीनुसार राष्ट्रीय अनुसूचीत जमाती आयोगाची स्थापना करण्यात आली. या मध्ये देखील नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आला.

Date 28 September 2003
The 89th Amendment to the Constitution of India. The National Commission for Scheduled Castes was established by amending Section 338. The commission has the power to appoint a chairman, a vice-chairman and three members. The word Scheduled Tribes was omitted from Section 338. Section 338A was newly added. And the National Commission for Scheduled Tribes was set up as per its provisions. In this, too, the power to make appointments was given to the President. by

दिनांक 28 सप्टेंबर 2003
भारतीय संविधान 90 वी घटनादुरूस्ती अनुसार 332 व्या कलमात दुरूस्ती करून आसाम राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बोडोलँड टेरिटोरियल एरिया डिस्ट्रिक्ट या भुभागातील अनुसूचीत जमाती व बिगर अनुसूचीत जमाती यांचे प्रतिनिधित्व कायम ठेवण्याची तरतूद करण्यात आली.

Date 28 September 2003 :
According to the 90th Amendment to the Constitution of India, Article 332 was amended to maintain the representation of Scheduled Tribes and Non-Scheduled Tribes in the Bodoland Territorial Area District in the context of Assembly elections in the State of Assam.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष आणि त्यांनी केलेले भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
jaibhimblogger.com/28-सप्टेंबर-दिनविशेष

jaibhimblogger.com/28-सप्टेंबर-1932-भाषण

jaibhimblogger.com/28-सप्टेंबर-1944-भाषण

jaibhimblogger.com/28-सप्टेंबर-1952-भाषण

 • Anil keshav Jadhav.
  September 28, 2021 at 2:50 pm

  Good information to increase our knowledge. Thank you very much

  • Suresh Hire
   September 30, 2021 at 11:53 am

   Thanks for comment.

  • Suresh Hire
   October 4, 2021 at 11:55 am

   धन्यवाद.

  • Suresh Hire
   November 21, 2021 at 12:28 am

   Please daily read and write comment.

 • पांडुरंग डांगे
  April 22, 2022 at 8:25 am

  बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांनी राजीनामा 27सप्टेंबर 1951 ला दिला.माहिती अचूक टाकावी.

  • Suresh Hire
   May 9, 2022 at 8:56 pm

   जयभिम, आपण चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. दिनांक 27 सप्टेंबर 1951 रोजी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. दिनांक 28 सप्टेंबर 1951 रोजी बाबासाहेबांनी आपला राजीनामा पंतप्रधान नेहरू यांना सोपविला. त्यामुळे तारीख चुकून 28 टाकली गेली. चूक दुरुस्त करण्यात येईल. धन्यवाद.

Leave Your Comment

Your email address will not be published.*

Forgot Password