Categories

Most Viewed

26 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 26 सप्टेंबर 1902
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अजमेर येथील हिंदू जैन मंदिरांना आणि मुस्लिम संत मीर खोजासाहेब यांच्या दर्ग्याला भेट दिली.

दिनांक 26 सप्टेंबर 1932
ब्रिटिश मंत्री मंडळाने पुणे करारावर ब्रिटिश संसदे कडून शिक्कामोर्तब करून तो मंजूर करून घेतला. त्यानंतर गांधीजींने आपले उपोषण सोडले.

दिनांक 26 सप्टेंबर 1944
रामचंद्रपुरमला येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्वागत करण्यात आले.

दिनांक 26 सप्टेंबर 1944
वेलंगी या गावच्या अस्पृश्यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र दिले.

दिनांक 26 सप्टेंबर 1944
ईस्ट गोदावरी डिस्ट्रिक्ट बोर्डतर्फे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र दिले. मानपत्राला उत्तर देताना त्यांनी ‘भारताची सध्याची परिस्थिती व तीत देशाचे हिताचे धोरण कोणते ?’ याबद्दल भाषण केले.

दिनांक 26 सप्टेंबर 1944
कोकीनाडा येथील शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, रचुपेटे डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन, आंध्र असोसिएशन आणि प्रबोधन साहित्य समिती या संस्थातर्फे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पी आर कॉलेज हॉल मध्ये मानपत्र दिले. मानपत्राला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ” ब्राम्हणेतर लोक ब्राह्मणी जातिभेदाच्या विषाने मानवी सदगुणांना मुकले”.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनविशेष आणि त्यांनी केलेले भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
jaibhimblogger.com/26-सप्टेंबर-दिनविशेष
jaibhimblogger.com/26-सप्टेंबर-1944-भाषण
jaibhimblogger.com/26-सप्टेंबर-1944-भाषण-1

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password