Categories

Most Viewed

24 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 24 सप्टेंबर 1873
जमीनदार, शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून, गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे यासाठी महात्मा ज्योतीबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

Date 24 September 1873
Mahatma Jyotiba Phule founded the Satyashodhak Samaj to liberate the Shudratishudra community from injustice, oppression and slavery perpetrated by landlords, Shetji and Purohits and to make them aware of their rights.

दिनांक 24 सप्टेंबर 1919
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुणे येथील शिवाजी मराठा हायस्कूलला पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली.

Date 24 September 1919
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj donated Rs. 25,000 to Shivaji Maratha High School in Pune.

दिनांक 24 सप्टेंबर 1932
दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात असा प्रमुख राजकीय नेत्यांमधे करार झाला. त्यावर महात्मा गांधी, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, पं मदनमोहन मालवीय, बॅ मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या आहेत. हा करार ’पुणे करार’ या नावाने ओळखला जातो.

Date 24 September 1932
Instead of giving separate constituencies to Dalits, there was an agreement among the major political leaders to give seats in proportion to the population in the general constituencies in all the provinces. It has the signatures of Mahatma Gandhi, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, Pandit Madan Mohan Malviya, Br. Mukundrao Jaykar and others. This agreement is known as ‘Pune Agreement’.

दिनांक 24 सप्टेंबर 1932
पुणे करारावर मदन मोहन मालवीय, तेज बहादुर सप्रू, एम आर जयकर, बी आर आंबेडकर, श्रीनिवासन, एम सी राजा, सी व्ही मेहता, सी राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद, जी डी बिर्ला, रामेश्वर दास बिर्ला, बी एस कामत, जी के देवधर, ए व्ही ठक्कर, आर आर बाखले, पी जी सोळंकी, पी बाळू, गोविंद मालवीय, देवदास गांधी, बिश्वास, पी एन राजभोज, जी ए गवई आणि शंकरलाल बनकर या तेवीस जणांनी सह्या केल्या. उर्वरित 18 जणांनी 25 सप्टेंबर 1932 रोजी सह्या केल्या
.

Date 24 September 1932
Madan Mohan Malviya, Tej Bahadur Sapru, MR Jayakar, B R Ambedkar, Srinivasan, M C Raja, C V Mehta, C Rajagopalachari, Rajendra Prasad, G D Birla, Rameshwar Das Birla, B S Kamat, G K Deodhar on Pune Agreement, A V Thakkar, R R Bakhle, P G Solanki, P Balu, Govind Malviya, Devdas Gandhi, Biswas, P N Rajbhoj, G A Gavai and Shankarlal Bankar signed the petition. The remaining 18 signed on September 25, 1932.

दिनांक 24 सप्टेंबर 1941
आर एम भट हायस्कूल परळ येथे भरलेल्या सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की, “इंग्रजांना वाचवण्यासाठी नव्हे तर आपल्या घराची राखरांगोळी होऊ नये म्हणून फलटणीत सामील व्हा” असे अस्पृश्य समाजाला आवाहन केले.

Date 24 September 1941
At a meeting held at R M Bhat High School, Parel, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar appealed to the untouchables to join Phaltan not to save the British but to keep their homes in ruins.

दिनांक 24 सप्टेंबर 1944
मद्रास येथे बुद्धीवादी सभेने आयोजित केलेल्या जाहीर सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ भारताचे बौद्धिक संस्करण ‘ या विषयावर भाषण करतांना वेदांवर व भगवत गीतेवर टिका करून कडाडून हल्ला चढविला.

Date 24 September 1944
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, while addressing a public meeting organized by the Intellectual Assembly in Madras, on the subject of ‘Intellectual Edition of India’, sharply attacked the Vedas and the Bhagwat Gita.

दिनांक 24 सप्टेंबर 1944
मद्रास येथे प्रभात टॉकीज मध्ये रेशनल सोसायटीच्या विद्यमाने, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘आपल्या धार्मिक, सामाजिक व राजकीय आयुष्याचा पाया बुद्धीवाद हाच असला पाहिजे’

Date 24 September 1944
In his address to the Rational Society at Prabhat Talkies in Madras, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said, “Rationalism should be the foundation of our religious, social and political life.”

दिनांक 24 सप्टेंबर 1944
मद्रास शहरातील अस्पृश्य महिलांतर्फे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना रायपेट्टा येथील वुडलँड या भव्य इमारतीत चहापार्टी देण्यात आली.

Date 24 September 1944
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was given a tea party by the untouchable women of Madras at the magnificent Woodland building in Raipetta.

दिनांक 24 सप्टेंबर 1944
दी संडे ऑब्झव्हर्नर, मद्रास पत्राचे संपादक श्री पी सुब्रहमण्यम मुदलियार यांस व सरकारी अधिकारी आणि इतरांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राम्हणेतर चळवळीसबंधी मार्गदर्शक विचार मांडले.

Date 24 September 1944
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar gave guiding thoughts on the non-Brahmin movement to The Sunday Observer, Editor of the Madras Patra, Shri P. Subrahmanyam Mudaliar and government officials and others.

दिनांक 24 सप्टेंबर 1944
मद्रास इलाखा शेड्युल्ड कास्टस फेडरेशनच्या विद्यमाने मद्रास येथील मेमोरियल हॉल, पार्क टाऊन येथे अस्पृश्यांच्या जाहीर सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शासन कर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा आहे.”

Date 24 September 1944
Speaking at a public meeting of the untouchables at Memorial Hall, Park Town, Madras in the presence of the Madras District Scheduled Castes Federation, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said, “Our goal and aspiration is to become a ruling tribe.”

दिनांक 24 सप्टेंबर 1951
हिंदू सहिता विधेयकाच्या चर्चेला पुन्हा प्रारंभ झाला. त्यावेळी रामनारायण म्हणाले की, आंबेडकरांची तुलना मनुबरोबर करतात. परंतु मनु हे सर्वांना मान्य होते. ते निर्बंध करीत असताना पोलिसांना त्यांचे संरक्षण करावे लागले नव्हते.

Date 24 September 1951
Discussions on the Hindu Sahitya Bill resumed. At that time, Ramnarayan said that he compares Ambedkar with Manu. But Manu agreed with everyone. The police did not have to protect them while they were restricting them.

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
jaibhimblogger.com/24सप्टेंबर-1944-भाषण
jaibhimblogger.com/24सप्टेंबर-1944-1-भाषण
jaibhimblogger.com/24सप्टेंबर-1944-2-भाषण

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password