Categories

Most Viewed

23 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 23 सप्टेंबर 1873 :
जमीनदार, शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून, गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे यासाठी महात्मा ज्योतीबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

Date 23 September 1873 :
Mahatma Jyotiba Phule founded the Satyashodhak Samaj to liberate the Shudratishudra community from injustice, oppression and slavery perpetrated by landlords, Shetji and Purohits and to make them aware of their rights.

दिनांक 23 सप्टेंबर 1902 :
दिल्ली येथील राज्याभिषेक दरबारासाठी उपस्थित राहण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सोडले.

Date 23 September 1902 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj left Kolhapur to attend the coronation court at Delhi.

दिनांक 23 सप्टेंबर 1917 :
गुजरात राज्यातील वडोदरा (बडोदा) येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले एक स्मारक व ऐतिहासिक स्थळ असून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्प केलेल्या सयाजी बागेला गुजरात सरकारद्वारे “संकल्प भूमी” असे नाव देण्यात आले.
संकल्प भूमी हे गुजरात मधील एक प्रमुख बौद्ध व अनुसूचित जातींचे तीर्थस्थळ म्हणून विकसित झाले असून येथे लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी येत असतात.

Date 23 September 1917 :
There is a monument and historical site dedicated to Dr. Babasaheb Ambedkar at Vadodara (Baroda) in the state of Gujarat.
Sankalp Bhumi has developed into a major Buddhist and Scheduled Caste pilgrimage site in Gujarat where people come to take initiation into the Buddhist Dhamma.

दिनांक 23 सप्टेंबर 1932 :
गोगटे पंथाच्या काही पुण्यातील विद्यार्थ्यांनी गुप्त सभा घेऊन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा खून करण्याचा गुप्त कट रचला.

Date 23 September 1932 :
Some Pune students of Gogte sect held a secret meeting and hatched a secret plot to assassinate Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.

दिनांक 23 सप्टेंबर 1932 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व प्रांतातील विधिमंडळात 197 जागा मागितल्या. तसेच प्राथमिक निवडणुकीची पद्धत दहा वर्षांनी रद्द करावे. परंतु पंधरा वर्षांनी राखीव जातीच्या पद्धतीविषयी अस्पृश्यांचे सार्वमत घ्यावे असा आंबेडकरांनी आग्रह धरला.

Date 23 September 1932 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar sought 197 seats in the legislatures of all the states. Also, the system of primary election should be abolished after ten years. But after fifteen years, Ambedkar insisted on holding a referendum on untouchables.

दिनांक 23 सप्टेंबर 1932 :
मुंबईतील वरळी येथे भरलेल्या एका सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आज जिकडे तिकडे तुमच्याकरिता देवालयाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न चालू आहे. हा प्रयत्न करणार्‍यांच्या हेतूबद्दल शंका नाही. परंतु देवालयात जाण्यास मिळाले म्हणजे तुमचा उद्धार होणार आहे असे नाही. देवालयातील मूर्तीभोवती खेळणाऱ्या परमार्थिक भावापेक्षा पोटाची खळगी कशी भरेल याची काळजी तुम्ही अधिक बाळगली पाहिजे. खाण्याला पुरेसे अन्न नाही, अंगभर वस्त्र नाही, शिक्षणाची सोय नाही, द्रव्याच्या अभावी औषध-पाणी घेता येत नाही अशा अवस्थेत सापडलेला आपला समाज आहे. मिळालेल्या राजकीय हक्कांचा उपयोग जीवनातील सुखसोयी उपभोगण्यास मिळतील अशा ध्येयाचे दिशेने तुम्ही प्रवास केला पाहिजे.

Date 23 September 1932 :
At a meeting held at Worli in Mumbai, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said that efforts are being made to open the doors of temples for you everywhere today. There is no doubt about the intentions of those who try this. But going to the temple does not mean that you will be saved. You should be more concerned about how to fill your stomach than the spiritual brother playing around the idols in the temple. Our society is in a state where there is not enough food to eat, no clothes for the whole body, no facilities for education, no medicine or water due to lack of material. You have to travel towards the goal of exercising your political rights and enjoying the comforts of life.

दिनांक 23 सप्टेंबर 1944 :
एम अँड एस एम रेल्वे एम्पलाईज युनियन पेरांबुर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मानपत्रास उत्तर देताना म्हणाले की, “मध्यवर्ती कायदे मंडळात 50% जागा आणि प्रांतिक कायदे मंडळात 30% जागा कामगारांकरिता राखीव ठेवाव्या”

Date 23 September 1944 :
Responding to the award, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at M & S ​​Railway Employees Union Perambur said, “50% seats in the Central Legislative Council and 30% seats in the Provincial Legislative Board should be reserved for workers.”

दिनांक 23 सप्टेंबर 1944 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि इ व्ही रामस्वामी नायकर यांची चेट्टीनाड हाऊस, अड्यार, मद्रास येथे भेट झाली.

Date 23 September 1944 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar and EV Ramaswami Naiker met at Chettinad House, Adyar, Madras.

दिनांक 23 सप्टेंबर 1944 :
मद्रास येथे रावबहादुर एन शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकारी मंडळाच्या झालेल्या बैठकीत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.

Date 23 September 1944 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was present at the meeting of the Executive Board of the Scheduled Caste Federation held at his residence in Madras under the chairmanship of Rao Bahadur N Shivraj.

दिनांक 23 सप्टेंबर 1956 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुर येथे विजया दशमीच्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारणार असल्याचे प्रसार माध्मांतून जाहीर केले.

Date 23 September 1956 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar announced in the media that he would convert to Buddhism on the day of Vijaya Dashami in Nagpur.

दिनांक 23 सप्टेंबर 2011 :
भारतीय संविधान 96 वी दुरुस्ती विधेयक (बिल) संमत करण्यात आले.

Date 23 September 2011 :
The 96th Amendment to the Constitution of India was passed.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password