Categories

Most Viewed

कर्मवीर भाऊराव पाटील

कर्मवीर भाऊराव पाटील

जन्म : 22 सप्टेंबर 1887 कुंभोज, महाराष्ट्र
मृत्यू : 09 मे 1959
वडिलांचे नाव : पायगौंडा
आईचे नाव : गंगाबाई
पत्नी : लक्ष्मीबाई
मूळ गाव : मूडब्रिदी, दक्षिण कन्नड, कर्नाटक
स्थायिक गाव : कुंभोज, हातकणंगले, कोल्हापूर
टोपणनाव : कर्मवीर
पेशा : समाजसुधारणा, शिक्षणप्रसार
संस्थापक : रयत शिक्षण संस्था (4 ऑक्टोबर 1919)
युनियन बोर्डींग, पुणे
दुधगाव शिक्षण मंडळ
महात्मा फुले अध्यापक विद्यालय (1935)
श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस
सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज
सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज
छत्रपती शिवाजी कॉलेज
आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन
पुरस्कार : पद्मभूषण (1959)
योजना : कमवा व शिका
सदस्य : सत्यशोधक समाज

रयत शिक्षण संस्थेची काही अशी उद्दिष्टे :

 1. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
 2. मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
 3. निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.
 4. अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.
 5. संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.
 6. सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
 7. बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
 8. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.

ठळक वैशिष्ठे :

 1. दिनांक 25 फेब्रुवारी 1927 रोजी महात्मा गांधींच्या हस्ते वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजीनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक 500 रुपयांची मदत सुरू केली.
 2. दिनांक 16 जून 1935 रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली.
 3. साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना सातार्‍यात हायस्कूल काढण्यासाठी चार हजार रुपये दिले व बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास साठ वर्षे झाल्या निमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिले.
 4. भारतातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’.
 5. 1947 साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर 1954 साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली.
 6. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे 1955 मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले.
 7. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ – या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
 8. महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला.
 9. भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.
 10. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन 1959 मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.
 11. रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मिळून 675 शाखा आहेत. त्यामध्ये 20 पूर्वप्राथमिक, 27 प्राथमिक, 438 माध्यमिक, 8 आश्रमशाळा, 8 अध्यापक विद्यालय, 2 आय.टी.आय व 41 महाविद्यालयांचा समावेश आहे.
 12. ह.रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे.
 13. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत.

रयतगीत –
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.

वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे || धृ ||

कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे

शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे
धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे || १ ||

गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई
कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई
स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे || २||

दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया

अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया
शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे ||३||

जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी
इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी

प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे ||४||

गीतकार – विठ्ठल वाघ

  Leave Your Comment

  Your email address will not be published.*

  Forgot Password