दिनांक 21 सप्टेंबर 1919 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कौन्सिल ऑफ रॉयल कोलनीयल इन्स्टिट्युटचे उपाध्यक्षपद स्विकारले.
दिनांक 21 सप्टेंबर 1931 :
अस्पृश्यांचे मलबार मधील पाठीराखे केलाप्पन यांनी गुरुवायूर मंदिरासमोर मंदिर प्रवेशाच्या बाजूने उपोषण सुरू केले. परंतु गांधीजींनी त्यांना उपोषण सोडावयाचे तारेने विनंती केल्यावरून व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विनंती केल्यावर त्यांनी आपला उपवास स्थगित केला.
दिनांक 21 सप्टेंबर 1932 :
टाईम्स ऑफ इंडिया वर्तमान पत्रांच्या प्रतिनिधींना मुलाखत देऊन आपण प्राणांतिक उपोषण का करणार आहोत याबद्दल म गांधीनी खुलासा केला की, आपले प्राणांतिक उपोषण मानवी धर्माच्या संरक्षणार्थ आहे. माझे उपोषण अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ नसावेत म्हणून आहे. अस्पृश्यांना घटनात्मक राखीव जागा द्याव्यात या विरुध्द नाही.
दिनांक 21 सप्टेंबर 1987 :
भारतीय संविधान 57 वी घटनादुरूस्ती करण्यात आली. 51 व्या घटनादुरूस्ती नुसार (1984) नागालँड, मेघालय, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या घटकराज्यातील आदिवासीसाठी राखीव जागांची सोय करण्यात आली होती. त्यासाठी घटनेच्या 330 व 332 या कलममध्ये बदल केले. आदिवासींचा हा विभाग मागासलेला होता. त्यांना त्यामुळे इतराबरोबर स्पर्धा करणे शक्य होत नव्हते, त्या करिता या घटनादुरूस्ती द्वारे 332 मध्ये दुरूस्ती करण्यात आली.