Categories

Most Viewed

19 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 19 सप्टेंबर 1932 :
म गांधीजीच्या आमरण उपोषणाच्या निमित्ताने आपली न्याय्य भूमिका स्पष्ट करणारे आणि गांधीजींचा उपवास, अस्पृश्यांचे हक्क व हितसंबंध यांच्याविरोधी कसा आहे हे दर्शविणारे पत्रक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे प्रसिद्ध केले.

Date 19 September 1932 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar published a pamphlet explaining his just role on the occasion of Gandhiji’s fast unto death and showing how Gandhiji’s fast is against the rights and interests of the untouchables.

दिनांक 19 सप्टेंबर 1932 :
पंडित मदन मोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन मर्चंट चेंबर या संस्थेच्या भव्य सभागृहात नियोजित परिषदेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, “गांधीजींनी अस्पृश्यांच्या हिताविरुद्ध प्राणांतिक उपोषण करावे ही खेदाची गोष्ट आहे. गांधीजींचे प्राण वाचविण्यासाठी प्रत्येक मनुष्याने आटोकाट प्रयत्न करावेत हे उचित आहे. परंतु गांधीजींनी दुसरी स्पष्ट योजना नसल्यामुळे या प्रसंगातून मार्ग काढणे कठीण होऊन बसले आहे. गांधीजी कडून तुम्ही बदली योजना आणावी म्हणजे त्यावर विचार करता येईल. परंतु एक गोष्ट आढळते, केवळ गांधीजींचे प्राण वाचविण्यासाठी माझ्या बांधवांच्या हिताच्या विरुद्ध जे योजना असेल त्या योजनेत मी भागीदार होणार नाही.

Date 19 September 1932 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said in a conference organized in the grand hall of the Indian Merchant Chamber under the chairmanship of Pandit Madan Mohan Malviya, “It is unfortunate that Gandhiji went on a deadly hunger strike against the interests of the untouchables. It is only right that every human being should make every effort to save Gandhiji’s life. But it is difficult to find a way out of this situation. But one thing is for sure, I will not be a part of any plan that is against the interests of my brothers just to save Gandhiji’s life.”

दिनांक 19 सप्टेंबर 1951 :
संसदेत हिंदू कोड बिलावर बोलताना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विवाह आणि घटस्फोट हा भाग स्वतंत्र विधेयक मानण्यात यावे असे निवेदन केले.

Date 19 September 1951 :
Speaking on the Hindu Code Bill in Parliament, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said that marriage and divorce should be considered as separate bills.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password