दिनांक 17 सप्टेंबर 1864 :
महाबोधी सोसायटीची स्थापना करणारे सारनाथ येथील मुलगंधकुटी शोधून काढणारे आणि बुद्धगया मुक्ती आंदोलनाचे प्रणेते अनागरिक धम्मपाल जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा.
दिनांक 17 सप्टेंबर 1879 :
भारतीय स्वातंत्र्यसैनिक, महान समाज क्रांतीकारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते एरोड व्यंकटप्पा रामास्वामी नायकर तथा पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.
दिनांक 17 सप्टेंबर 1894 :
पुण्यातील जनतेच्या वतीने हिराबाग टाऊन हॉल या ठिकाणी सार्वजनिक सभेमार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानपत्र आणि खास मेजवानी देण्यात आली.
दिनांक 17 सप्टेंबर 1885 :
भारतीय पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.
दिनांक 17 सप्टेंबर 1927
एलफिन्स्टन रोडवरील डेव्हीड मिलच्या चाळीच्या कंपाउंडात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जाहिर सभेत त्यांनी सांगितले की, “आपण धडा घालून दिला पाहिजे की, आपण कोणाहीपेक्षा कमी नाही.”
दिनांक 17 सप्टेंबर 1937 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातील खोती नष्ट करण्यासाठी त्यांनी खोती बिल मुंबई विधी मंडळात मांडले.
दिनांक 17 सप्टेंबर 1943 :
डॉ एम एन रॉय यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या हिंदी कामगार फेडरेशन (द इंडियन फेडरेशन ऑफ लेबर) या संस्थेच्या विद्यमाने दिल्ली येथे आयोजित दि ऑल इंडिया ट्रेड यूनियन वर्कस स्टडी कॅम्प वेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मजूर आणि संसदीय लोकशाही’ विषयावर भाषण केले.
दिनांक 17 सप्टेंबर 1951 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुद्ध उपासना पाठ’ ही बुद्ध वंदनेची पुस्तिका प्रकाशित केली.
दिनांक 17 सप्टेंबर 1977 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र, बौद्धचार्याचे जनक, चैत्यभूमीचे शिल्पकार यशवंतराव तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मूर्ती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.