Categories

Most Viewed

11 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 11 सप्टेंबर 1923 :
बोले ठराव अंमलात आणण्यासाठी मुंबई सरकारने परिपत्रक काढले.

Date 11 September 1923 :
The Mumbai government issued a circular to implement the Bole resolution.

दिनांक 11 सप्टेंबर 1938 :
मुंबई विधी मंडळात ‘औद्योगिक तंटा’ या विधेयकावर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आणि जमनादास मेहता कामगारांचा संप सुरू करण्याचा हक्क डावलण्याला विरोध केला.

Date 11 September 1938 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar and Jamnadas Mehta opposed the violation of the right of workers to start a strike on the ‘Industrial Disputes’ Bill in the Mumbai Legislative Council.

दिनांक 11 सप्टेंबर 1938 :
पुणे येथील डी सी मिशनच्या हॉलमध्ये झालेल्या अस्पृश्य विद्यार्थ्यांचे अकरावे संमेलनात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “दीर्घ उद्योग व कष्ट करण्यात यश प्राप्त होते.”

Date 11 September 1938 :
In his presidential address at the Eleventh Conference of Untouchable Students held at the DC Mission Hall in Pune, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said, “Success is achieved through long industry and hard work.”

दिनांक 11 सप्टेंबर 1956 :
भारतीय संविधान सहावी घटनादुरूस्ती करण्यात आली या घटनादुरूस्ती द्वारे कलम 269 आणि 286 यामध्ये बदल घडवून आणले. घटकराज्यात होणार्‍या मालाच्या खरेदी विक्रीवर नवीन कर लावण्याविषयी तरतूद करण्यात आली. या घटनादुरूस्ती अन्वये सातव्या परिशिष्टात 92 अ समाविष्ट करण्यात आले.

Date 11 September 1956 :
The Sixth Amendment to the Constitution of India amended Articles 269 and 286. Provision was made for imposition of new tax on sale and purchase of goods in the constituent states. 92A was included in the Seventh Schedule under this amendment.

दिनांक 11 सप्टेंबर 1984 :
भारतीय संविधान 49वी घटनादुरूस्ती करण्यात आली. त्रिपुरा सरकारच्या सुचनेनुसार घटनेच्या सहाव्या परिशिष्टातील तरतुदींचा वापर त्रिपुरा राज्यातील आदिवासी प्रदेशांच्या विकासासाठी करावा याकरिता घटनेत तसे बदल करण्यात आले. त्यानुसार स्वायत्त जिल्हामंडळे निर्माण करण्यात आली.

Date 11 September 1984 :
The 49th Amendment to the Constitution of India. At the suggestion of the Government of Tripura, the provisions of the Sixth Schedule to the Constitution were amended to allow for the development of the tribal areas in the State of Tripura. Autonomous districts were formed accordingly.

दिनांक 11 सप्टेंबर 1984 :
भारतीय संविधान 50वी घटनादुरूस्ती नुसार घटनेच्या 33 व्या कलमानुसार मूलभूत हक्का मधील तरतुदींचा फायदा संरक्षक दल आथवा पोलिस दलातील कर्मचार्‍यांना देताना देशातील सूव्यवस्था आणि लष्करातील/ पोलिस दलातील शिस्त यावर विपरीत परिणाम होणार नाही यात दक्षता घेण्यासाठी ही दुरूस्ती करण्यात आली. त्यानुसार राज्याच्या मालकीची मालमत्ता / आथवा राज्याच्या ताब्यातील मालमत्ता यांचे रक्षण करण्याची लष्कर व पोलिस दलाची आहे. राज्याने निर्माण केलेल्या गुप्तहेर संघटनेला देखील हे तत्व मान्य करण्यात यावे. राष्ट्रीय सुरक्षा दलात शिस्त राहावी यासाठी ही घटनादुरूस्ती करण्यात आली.

Date 11 September 1984 :
The amendment was made to ensure that the provisions of Article 33 of the 50th Amendment to the Constitution of India do not adversely affect the order of the country and the discipline of the Army / Police while giving the benefit of the provisions of the fundamental rights to the personnel of the Guard or the Police. Accordingly, the army and the police have the power to protect state-owned property or state-owned property. This principle should also be accepted by the intelligence organization created by the state. The incident was amended to maintain discipline in the National Security Forces.

दिनांक 11 सप्टेंबर 2019 :
केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते दादर येथील चैत्यभूमी परिसरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भिमज्योतीचे अनावरण करण्यात आले.

Date 11 September 2019 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar’s Bhimjyoti was unveiled at the hands of Union Minister of State Namdar Ramdas Athavale at Chaityabhoomi premises in Dadar.

दिनांक 11 सप्टेंबर 2019 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण आणि 105 फूट उंचीचा राष्ट्रध्वज लोकार्पण सोहळा निलंगा शहरात संपन्न झाला.

Date 11 September 2019 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar full size statue unveiled and 105 feet high national flag unveiling ceremony was held in Nilanga city.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password