Categories

Most Viewed

06 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 06 सप्टेंबर 1943 :
मजूर मंत्री विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय मजूर परिषदेचे दुसरे अधिवेशन संपन्न झाले. आपल्या भाषणात त्यांनी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सांस्कृतिक साधने आणि आरोग्याची साधने याविषयी कामगारांच्या मागण्या मांडल्या.

Date 06 September 1943 :
The second session of the tripartite labor council was held under the chairmanship of Labor Minister Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar. In his speech, he presented the demands of the workers for food, clothing, shelter, education, cultural tools and health tools.

दिनांक 06 सप्टेंबर 1954 :
‘वर्गीकृत जाती आणि अन्य वर्गीकृत जाती’ आयुक्त यांच्या प्रतिवृत्तावर भाषण करताना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या बाबतीतल्या सरकारी धोरणावर आणि हिंदूच्या वृत्तीवर खरमरीत टीका केली.

Date 06 September 1954 :
Speaking on the response of the Commissioner on ‘Classified Castes and Other Classified Castes’, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar sharply criticized the government’s policy on untouchability and the attitude of Hindus.

दिनांक 06 सप्टेंबर 1954 :
‘अस्पृश्यता विषयक गुन्हे’ या विधेयकावर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेत म्हणाले की, “अस्पृश्य बाबत गुन्हा करणाऱ्यांना शासन केल्याविना अस्पृश्यतेचे निर्मूलन होणार नाही. सामाजिक बहिष्कार टाकणा-यांना शिक्षा दिली पाहिजे. कारण ते आपल्या सांपत्तिक स्थितीमुळे खेड्यातून अस्पृश्यांवर बहिष्कार टाकून त्यांना घटनेने दिलेले अधिकार उपभोगण्यास प्रतिबंध करू शकतात.”

Date 06 September 1954 :
Commenting on the Untouchability Crimes Bill, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said in the Rajya Sabha, “Untouchability will not be eradicated without punishing the perpetrators of untouchability. Social exclusion should be punished. Because they can boycott the untouchables from the village because of their financial status and prevent them from enjoying the rights given to them by the Constitution.”

दिनांक 06 सप्टेंबर 2001 :
महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये, डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, 17 वा खंड आयुष्यमान वसंत मून यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाला.

Date 06 September 2001 :
The 17th volume of Dr. Babasaheb Ambedkar’s writings and speeches, was published at the Yashwantrao Chavan Pratishthan by the then Governor of Maharashtra, Dr. PC Alexander, in the presence of Shri Vasant Moon.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password