अस्पृश्यता नष्ट करण्याची तळमळ न बाळगणाऱ्या
राजकीय पक्षांपासून सावध रहा !
मीरत येथे दिनांक 5 ऑक्टोबर 1953 रोजी एका जाहीर सभेत अस्पृश्यांना उद्देशून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
जातीभेद व अस्पृश्यता नष्ट करण्याची तळमळ न बाळगणाऱ्या इतर राजकीय पक्षांपासून सावध रहा.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष रशियन ध्येयप्रणालीवर उभारला असेल तर आगामी म्युनिसीपल निवडणुकीत त्या पक्षाशी सहकार्य करण्यासही शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन तयार आहे. पण इतर पक्षांप्रमाणे भारतीय कम्युनिस्टही जातीभेद व अस्पृश्यता घालवू शकलेले नाहीत.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना थैली अर्पण करण्यात आली.