Categories

Most Viewed

01 सप्टेंबर दिनविशेष

दिनांक 01 सप्टेंबर 1895 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सौ रखमाबाई केळवकर यांची लेडी सुपरिटेंडेट ऑफ दि वुमेन्स स्कूल म्हणून कोल्हापूर संस्थानातील मुलींच्या शाळेवर देखरेख करण्यासाठी नेमणूक केली.

Date 01 September 1895 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj appointed Mrs. Rakhmabai Kelvakar as Lady Superintendent of the Women’s School to oversee the girls’ school in Kolhapur State.

दिनांक 01 सप्टेंबर 1902 :
मागासवर्गीयांसाठी 50% राखीव जागा ठेवण्याच्या जाहीरनामासाठी हातकणगले नगरपालिकेकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा सत्कार करण्यात आला.

Date 01 September 1902 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj was felicitated by Hatkangale Municipality for announcing 50% reserved seats for backward classes.

दिनांक 01 सप्टेंबर 1911 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मुलीचा मुलगा दत्तक घेण्यास हिंदूंना परवानगी देणारा हुकुम काढला.

Date 01 September 1911 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj issued an order allowing Hindus to adopt a girl’s son.

दिनांक 01 सप्टेंबर 1947 :
मुंबई नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाने पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ राजेंद्र प्रसाद व मौलाना आझाद यांना मानपत्र देण्यासाठी एक ठराव केला. विरोधी पक्षातील सभासदांनी भारतातील नवीन मंत्रिमंडळातील आंबेडकर, गाडगे आणि पापा यांच्यासह सर्व मंत्र्यांना मानपत्र द्यावे अशी सूचना केली. त्यांच्या सूचनेला स का पाटील यांनी विरोध केला.

Date 01 September 1947 :
The Congress party in the Mumbai municipality passed a resolution to honor Pandit Nehru, Sardar Patel, Dr Rajendra Prasad and Maulana Azad. Members of the Opposition demanded that all the ministers in the new Indian cabinet, including Ambedkar, Gadge and Papa, be honored. S K Patil opposed his suggestion.

दिनांक 01 सप्टेंबर 1951
औरंगाबाद येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विद्यमाने सुरू केलेल्या कॉलेजच्या नव्या इमारतीची कोनशिला स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र प्रसाद यांना वेरूळची लेणी पहावयास घेऊन गेले.

Date 01 September 1951 :
The cornerstone of the new college building started by Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar at Aurangabad in the presence of the People’s Education Society is of independent India.
The ceremony was officiated by President Dr. Rajendra Prasad. After the program, Dr. Babasaheb Ambedkar took Rajendra Prasad to see the caves of Ellora.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password