Categories

Most Viewed

23 ऑगस्ट दिनविशेष

दिनांक 23 ऑगस्ट 1937 :
दिवाणाच्या पगारा संबंधी पहिल्या सरकारी बिलावर स्वतंत्र मजूर पक्षाचे पुढारी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी असेंब्लीमध्ये भाषण केले.
सदर भाषण जनता अंकात 28 ऑगस्ट 1937 रोजी प्रसिद्ध झाले.
सविस्तर भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
jaibhimblogger.com/23-ऑगस्ट-1937-भाषण

Date 23 August 1937 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, the leader of the Independent Labor Party, addressed the assembly on the first government bill on Diwana’s salary.
The speech was published in the Janata Issue on 28 August 1937.

दिनांक 23 ऑगस्ट 1942 :
दिल्ली येथे दलित वर्गीय हितकारिणी तर्फे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, “अस्पृश्य समाजाला बरोबरीने स्थान प्राप्त करून देणे हे माझे साध्य आहे. तुम्ही इतरांचे गुलाम राहू नये यासाठी शासनाची सूत्रे तुमच्या हाती द्यावयाची आहेत.”

Date 23 August 1942 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was felicitated by a Dalit benefactor in Delhi. He then said, “My goal is to give an equal place to the untouchable community. I want to give you the formula of government so that you do not remain a slave to others.”

दिनांक 23 ऑगस्ट 1945 :
कलकत्ता येथे बंगाल व बिहार सरकारच्या प्रतिनिधी समोर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर खोरे योजनेवर विवेचन केले.

Date 23 August 1945 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar discussed the Damodar Valley Plan in front of the representatives of the Government of Bengal and Bihar at Calcutta.

संकलन : विजया सुरेश हिरे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password