Categories

Most Viewed

16 ऑगस्ट दिनविशेष

दिनांक 16 ऑगस्ट 1926 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र राजरत्न याचे निधन झाल्यावर, त्यांचे कोल्हापूरचे परमस्नेही दत्तोपंत पवार यांचे सांत्वनपर पत्र आले. बाबासाहेबांना शोक आणि व्यथित झालेले त्यांचे हृदय, दुःखाने अति भारावून गेले. त्यांनी पवारांना पत्रात लिहितात की, ‘पुत्र निधनामुळे आम्हा उभयतांस जो धक्का बसला आहे त्यातून आम्ही बाहेर पडू असे म्हणणे शुद्ध ढोंगीपणाचे होईल. आतापर्यंत तीन मुलगे आणि एक मुलगी अशा चार लाडक्या बाळांना मूठमाती देण्याचा प्रसंग आमच्यावर ओढवला. त्यांची आठवण झाली की, मन दुःखाने खचते. त्यांच्या भविष्याविषयी जे मनोरथ आम्ही बांधले होते, ते ढासळले ते वेगळेच. आमच्या जीवनावरून हा दुःखाचा ढग वाहत आहे.  मुलांच्या मृत्यू बरोबर जीवनाला चव आणणारे मिठच नष्ट झाल्यामुळे आमचे जीवन अळणी झाले आहे. माझा शेवटचा मुलगा असामान्य होता. त्याच्या सारखा मुलगा मी क्वचितच पाहिला असेन. तो गेल्यावर माझे आयुष्य रानाने माजलेल्या बागेसारखे झाले आहे. दु:खातिशयामुळे पुढे काही लिहीत नाही. दुःखाने खंगलेल्या तुझ्या मित्राचा तुला नमस्कार.

Date 16 August 1926 :
After the death of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar’s son Rajaratna, a letter of condolence came from his beloved Dattopant Pawar of Kolhapur. Babasaheb was overwhelmed with grief and anguish.
In a letter to Pawar, he wrote, “It would be pure hypocrisy to say that we will get out of the shock that has befallen both of us due to the death of our son.” So far, we have had the opportunity to shake hands with four cute babies, three boys and a girl. He remembered that the mind is consumed with sorrow. The aspirations we had for their future were shattered. This cloud of sorrow is flowing from our lives. With the death of children, the salt that tastes life has been destroyed and our lives have been ruined. My last son was unusual. I have seldom seen a boy like him. When he passed away, my life became like a garden planted by the forest. Sadly, he does not write anything further. Greetings to your grief-stricken friend.

दिनांक 16 ऑगस्ट 1941 :
सिन्नर जिल्हा नाशिक येथील झालेल्या जाहीर सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जुडी कर अन्यायकारक असल्याचे सांगून निषेध व्यक्त केला.
सदर भाषण जनता अंकात 23 ऑगस्ट 1941 रोजी प्रसिद्ध झाले.
सविस्तर भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.*
jaibhimblogger.com/16-ऑगस्ट-1941-भाषण

Date 16 August 1941 :
At a public meeting held in Sinnar district, Nashik, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, in his presidential address, protested that Judy tax was unjust.

संकलन : विजया सुरेश हिरे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password