दिनांक 23 ऑगस्ट 1878 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वडील आबासाहेब यांना राज्यकारभाराचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे म्हणून त्यांना असिस्टंट पॉलिटिकल एजंट हॅमिक यांच्या न्यायालयात दिवाणी व फौजदारी खटले कसे चालवावयाचे याचे शिक्षण घेण्यासाठी पाठवले असे राव बहादुर बर्वे यांनी पॉलिटिकल एजंट स्नाईडर यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले.
दिनांक 12 ऑगस्ट 1884 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पालक आणि प्रमुख राजनैतिक प्रतिनिधी सहाय्यक म्हणून मिस्टर फिटझिराल्लड यांची नेमणूक करण्यात आली.
दिनांक 21 ऑगस्ट 1884 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वडील आबासाहेब यांनी कागल येथे मुलींची शाळा स्थापन केली.
दिनांक 10 ऑगस्ट 1894 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते कागल जहागिरीची सुत्रे बंधू बापूसाहेब महाराज यांना बहाल करण्यात आली.
दिनांक 26 ऑगस्ट 1895 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिव छत्रपतींच्या समाधीची दुरुस्ती करावी म्हणून पुण्यातील प्रमुख प्रतिष्ठित व्यक्तींचे एक शिष्टमंडळ त्यांना भेटले.
दिनांक 18 ऑगस्ट 1901 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची बाळ गंगाधर टिळक यांनी कोल्हापूर येथे भेट घेतली.
दिनांक 01 ऑगस्ट 1902 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे युरोपहून इंग्लंडला आगमन झाले.
दिनांक 02 ऑगस्ट 1902 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी लंडनमधील भारतीय विद्यार्थ्यांशी चर्चा आणि त्यांना मेजवानी दिली.
दिनांक 09 ऑगस्ट 1902 :
ब्रिटिश सम्राट सातवे एडवर्ड यांच्या राज्याभिषेक समारंभास वेस्ट मिनिस्टर अँबे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची उपस्थिती.
दिनांक 14 ऑगस्ट 1902 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे भारतात परतण्यासाठी लंडनहून प्रयाण.
दिनांक 31 ऑगस्ट 1902 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे लंडनहून मुंबईत आगमन.
दिनांक 09 ऑगस्ट 1905 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते दिगंबर जैन बोर्डिंगचे उद्घाटन करण्यात आले.
दिनांक 01 ऑगस्ट 1918 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी महार, मांग, रामोशी व बेरड या तथाकथित गुन्हेगारी जमातीची हजेरी पद्धत कायद्याने बंद केली.
दिनांक 16 ऑगस्ट 1918 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी करवीर संस्थानातील शंभर रुपयांहून अधिक उत्पन्न असणाऱ्या मंडळीवर डॉक्टर, वकील, सावकार, अमलदार, इनामदार वगैरेवर शिक्षण कर बसविण्यात आला.
दिनांक 02 ऑगस्ट 1919 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी, स्त्रियांचा छळ आणि घटस्फोट याविषयी स्त्रियांना संरक्षण देणारा कायदा केला.
दिनांक 26 ऑगस्ट 1919 :
गावात ज्या जातीची संख्या अधिक असेल त्या जातीचा तलाठी नियुक्त करणे त्याचप्रमाणे प्रत्येक पेट्या मध्ये निदान पाच आणि महालामध्ये तीन असे अस्पृश्य तलाठी नेमले जावेत असा हुकूम राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काढला.
दिनांक 29 ऑगस्ट 1919 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी वैदिक शिक्षण देण्याचे वर्ग जुन्या राजवाड्यावर सुरू केले.
दिनांक 15 ऑगस्ट 1920 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर येथील आर्य क्षत्रिय परिषदेच्या भरलेल्या अधिवेशनात आपले विचार स्पष्टपणे मांडताना ते म्हणाले की, “जातिभेद हा हिंदुस्थानास लागलेला मोठा रोग आहे”. त्यांनी बोर्डिंग साठी 20′ x 120′ अशी जागा गंगा वेशीत दिली.
दिनांक 21 ऑगस्ट 1921 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुणे येथील शनिवार वाड्यांच्या दुरुस्तीसाठी दोन हजार रुपयांची देणगी दिली.
दिनांक 22 ऑगस्ट 1921 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी लंडन येथील बॉस स्काऊट असोसिएशनला एक हजार रुपयांची देणगी व ती चळवळ मुंबई इलाख्यात सुरू व्हावी म्हणून दोन हजार रुपयांची देणगी दिली.