Categories

Most Viewed

महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था बाबत मनोगत

महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था बाबत मनोगत.

महाराष्ट्र राज्यात एक लाखाच्या वर महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था कार्यरत आहेत. परंतु त्यातील बहुतेक गृहनिर्माण संस्था कार्यकारिणी समिती चालवत असते तर काही थोड्या गृहनिर्माण संस्था, अन्य कारणामुळे सह निबंधक साहेब यांच्या ताब्यात असते. त्याचे कारण असे असते की, बहुतेक गृहनिर्माण संस्था महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था कायदा 1960 नियम 1961, आदर्श उपविधी तसेच शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेले परिपत्रक यावर अंमलबजावणी करताना दिसून येत नाही. त्यामुळे बहुतेक सभासद सहनिबंधक कार्यालयात लेखी तक्रार दाखल करतात. सोसायटीचे कामकाज करताना दोन गोष्टी कार्यकारिणी समिती अवलंब करताना दिसत असते. एक Practice आणि दुसरे म्हणजे Procedure.

Practice म्हणजे मागील समिती जे काम करत होते तेच काम विद्यमान कार्यकारणी समिती करत असते. ते Procedure प्रमाणे काम करताना दिसत नाही. ये रे माझ्या मागल्या प्रमाणे ते काम करताना दिसून येतात. समितीला असे वाटते की, आम्ही या संस्थेचे Trustee नसून मालक आहे व आम्हाला सर्व अधिकार आहे. आम्ही जे करतो ते बरोबर आहे या भ्रमात ते असतात. त्यामुळे संस्थेत सभासद व समिती यांच्यात वादविवाद होताना दिसून येते. तसेच काही वेळा ते वादविवाद सहनिबंधक कार्यालयात अथवा कोर्टात जाते. कार्यकारणी समितीत काही सदस्य कोरम पुर्ण करण्यासाठी फक्त नावापुरती असतात. बहुतेक संस्था अध्यक्ष, सचिव किंवा एखादा सदस्य चालवताना दिसून येते.

Procedure म्हणजे कार्यकारिणी समितीने महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था कायदा 1960 नियम 1961, आदर्श उपविधी तसेच शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेले परिपत्रक याचा अभ्यास करून संस्था चालवणे. परंतू सर्वच गोष्टी समितीला माहित नसतात हे मान्य आहे. पण काही वेळा समिती समजून घेण्याचा सुध्दा प्रयत्न करताना दिसून येत नाही. संस्थेच्या कार्यकारणी समितीवर काम करण्यास कोणीही सहजासहजी तयार होत नाही. परंतू संस्था सहनिबंधक ताब्यात घेऊ नये म्हणून नाईलाजाने ते समितीवर येतात व आपला कार्यकाल पूर्ण करतात. अशाने संस्थेचा विकास होणे अवघड होऊन बसते. बहुतेक संस्था फेडरेशनचे सभासद असतात. फेडरेशनने शासनाचे प्रत्येक अपडेट व परिपत्रक ऑनलाईन संस्थेला दिल्यास बरेच प्रश्न सुटू शकतात. परंतू समिती प्राथमिक सल्ला घेण्यासाठी फेडरेशनकडे जाताना दिसत नाही. फेडरेशनचे संस्था विषयक काय जबाबदारी आहेत ? हे समजण्याचा प्रयत्न सुध्दा करत नाही.

सर्वात महत्वाचे म्हणजे, संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी संस्थेने संगणकीकरण आणि एखादे संकेतस्थळ तयार करणे गरजेचे आहे असे मला वाटते. ज्यामध्ये संस्थेचे सभासद आणि भाडेकरू फक्त त्याचा उपयोग करू शकतात. उदा. टेलिग्राम, फेसबुक, ईमेल किंवा अन्य प्रकार. जेणे करुन सर्व रेकॉर्ड सुरक्षित राहतील. संस्थेचा कारभार कसा असावा याची माहिती युट्यूब वर सुध्दा ऐकण्यास मिळते. पण त्याचा वापर क्वचित लोक करत असतात. हल्ली बहुतेक संस्था Whataapp या अँपचा वापर करताना दिसून येत आहे. परंतू त्यामूळे मोबाईलच्या मर्यादित मेमरी मुळे मोबाईल हँग होण्याची शक्यता जास्त असते. Whataapp या अँपचा वापर फक्त सुध्दा मर्यादित असावा.

एखाद्या सभासदाने संस्थेस लेखी तक्रार दाखल केल्यास, त्या सभासदास ऑफिस कार्यालयात बोलावून एकमेकांशी वादविवाद न करता चर्चा करणे आवश्यक आहे. त्यावेळी ज्याला त्याला आपली चूक समजून येईल व त्यातून मार्ग निघू शकेल. पण असे करताना कोणीही दिसून येत नाही.

महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक होण्यासाठी मी माझ्या परीने थोडासा प्रयत्न सुरू करत आहे. कदाचित त्याचा थोडाफार फायदा होऊ शकेल असे वाटते. तरी आपले मत अवश्य नोंदवा.

सुरेश पांडुरंग हिरे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password