Categories

Most Viewed

पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे

पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे
बोधिवृक्षाने कथन केले, ते चारित्र्य गौतमाचे II

किती घोर तपस्या ती, देहाचे वारूळ झाले
बुद्धगया अजंठा ही, साक्षात वेरूळ आले
अष्टगाथा मंगलमय ते, पावित्र्य गौतमाचे
पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे II

या सावलीत माझ्या, विश्वाची माऊली ती
ह्रदयात मानवाच्या, धम्मज्योत लाविली ती
जग जिंकूनी झाले, ते मित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे II

कधी केला नाही गर्व, ना वाद कधी केला
तरी देश आज म्हणतो, मी बुद्धाचा चेला
बुद्धाने बुद्ध पाहे, सचित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे II

लिहिले कुठेच नाही, हा माझा धम्म आहे
निर्वाणपदानंतर, या जगी स्तुप आहे
भिमदुतास कळले ते, सन्मित्र गौतमाचे
पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे II

बोधिवृक्षाने कथन केले, ते चारित्र्य गौतमाचे..
पिंपळाच्या पानावर, पाहिले चित्र गौतमाचे II

गायक : प्रल्हाद शिंदे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password