Categories

Most Viewed

पंचशीला त्रिशरण हि तत्त्वे दिधली या बहुजना

पंचशीला त्रिशरण हि तत्त्वे दिधली या बहुजना
बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे, बुद्धं सरणं म्हणा II
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि

पंचशीलाची पंचतत्त्वे हि मार्ग दाविती भला
सत्य अहिंसा आणि शांतीच्या छायेत राहू चला
खोटे बोलणे चोरी करणे छंद नसे चांगला
सकलासाठी तथागताने हा उपदेश दिला
कुणीही यावे पावन व्हावे निर्मळ करुनी मना
बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे, बुद्धं सरणं म्हणा II

भेदभावाची चिता पेटवून समतेने नांदूया
हितकारक ही तत्त्वे सारी आचरणी आणूया
त्यजूनी वाईट व्यसने आपण सौख्याला साधूया
आदर्शाचे जीवन अपुले जगताला दावूया
उच्च असो की नीच असो हा दोष न द्यावा कुणा
बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे, बुद्धं सरणं म्हणा II

समानता अन मानवताही श्रद्धेने आचरा
दुःखी जीवांचे दुःख हरावे मर्म हे ध्यानी धरा
नीती शील अन प्रज्ञा करुणा नेमाने अनुसरा
बुद्धाची ही शिकवण तुम्हा पालन याचे करा
माणूस म्हणुनी जगण्यासाठी हीच दिली प्रेरणा
बुद्धं सरणं म्हणा म्हणा रे, बुद्धं सरणं म्हणा II

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password