गौतमाचे चरणी फूल वाहिलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले II
दिनी पौर्णिमेच्या बोधीवृक्षाखाली
बुद्ध पहुडलेले ज्ञान जाग आली
ज्ञानीयामुळे अवघे विश्व जागलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले II
दुःख मानवी सारे बुद्धास कळले
राज्यत्याग करुनी सत्यमार्गी वळले
तयांच्यामुळे विश्व-युद्ध टळलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले II
दीन-दुःखितांना सवे घेऊनिया
दया-क्षमा-शांती मंत्र देऊनिया
उद्धरले बुद्ध-मार्गी चाललेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले II
त्रिशरण पंचशीला अष्टांग मार्ग
विश्वकल्याणाचा दावी सन्मार्ग
सत्यशील उद्धारक धम्म निवडलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले II
गौतमाचे चरणी फूल वाहिलेले
साकार झाले स्वप्न पाहिलेले II
गायक : कृष्णा शिंदे